प्रतिनिधी : यवतमाळ : साई वात्सल्य बहुउद्देशीय संस्था कोपरगाव व स्काय ईन्टरनॅशनल टुरिझम महाराष्ट्र यांच्यासंयुक्त विद्यमाने दिला जाणारा प्रतिष्ठेचा महाराष्ट्र सेवा भूषण पुरस्कार यंदा यवतमाळ येथील सुनीता भगवान भीतकर यांना प्रदान करण्यात आला.
शिर्डी येथे साई सिल्व्हर ओक लॉन येथे ०३/०७/२०२२ रोजी साई सामाजिक व सांस्कृतिक विचार संम्मेलन २०२२ चे आयोजन करण्यात आले होते. प्रख्यात अभिनेता दिगंबर नाईक यांच्या हस्ते उक्त पुरस्कार सुनीता भगवान भीतकर यांना प्रदान करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शिर्डी संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत (भाप्रसे), रत्ना पाटील चांदवडे, शिक्षण महर्षी श्री. तांबे, डॉ. बी.एन. खरात, आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.
अनु. जाती, अनु. जमाती प्रवर्गातील महिलांना, युवतींना फॅशन डिझायनिंग च्या माध्यमातून रोजगार निर्मितीकरिता प्रशिक्षण देणे, शालेय विद्यार्थीनींना स्वसंरक्षणाचे धडे देणे इत्यादी कार्य मागील १७ वर्षा पासून अविरतपणे करत असलेल्या सुनीता भगवान भीतकर यांच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांना उक्त पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. यवतमाळ येथील सामाजिक सुनीता भगवान भीतकर यांना आता पर्यंत विविध शासकिय व प्रतिष्ठित संस्थानांच्या वतीने ५५ पेक्षा जास्त पुरस्कार प्रात झालेले आहेत. सुनीता भीतकर यांना महाराष्ट्र सेवा भूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.