जालना-लक्ष्मण बिलोरे
समाजात मुलांच्या तुलनेत मुलींचा संख्यादर कमी असल्याने मुलांच्या लग्नाचा प्रश्न भेडसावत असून वर मुलाकडील मंडळी मुलाच्या लग्नासाठी वाटेल ते करायला राजी होत आहेत .याचाच फायदा काही भामटे लोक उचलत आहेत.खोटे लग्न लावून देणारे एजंट,पैशाच्या लालचेने खोट्या लग्नासाठी तयार असलेल्या धंदेवाईक स्रिया यांचा अलिकडच्या काळात सुळसुळाट वाढला आहे…
त्याचे असे झाले,खोटे लग्न करून पैसे उकळणाऱ्या एका तरूणीला आणि तिच्या नातेवाईकांना पोलिसांनी अटक केली.आरोपी तरूणीने दोन लाख रूपये घेवून लग्न केले होते.लग्नानंतर काही दिवसांत ती पहिला पती आणि नातेवाईकांकडे पळून जाण्याच्या तयारीत होती.या प्रकरणी भोकरदन पोलिसांनी आरोपी महिलेसह नऊ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.सओयगाव देवी येथील रावसाहेब भाऊसाहेब सहाने वय २५, हा तरूण नेवासा येथील एका खासगी कंपनीत नोकरी करतो.सहानेयांच्या विवाहासाठी रमेश शेळके यांच्या मध्यस्थीने एका मुलीचे स्थळ सांगून आले. सोनी वानखेडे नावाची मुलगी असून ती आश्रमात राहते.लग्न करायचे असल्यास तिला दोन लाख रूपये द्यावे लागतील असे सांगितले. लग्नासाठी मुलगी मिळत नसल्याने रावसाहेबचे नातेवाईक लग्नाला तयार झाले.त्यानंतर २४ जून रोजी रावसाहेबचा विवाह सोनी वानखेडे सोबत लावून देण्यात आला.लग्नाला मुलीच्या आईसह इतर नातेवाईक उपस्थित होते. लग्न झाल्यावर त्यांना सहाने यांच्या कुटुंबीयांनी दोन लाख रूपये देवून टाकले .त्यानंतर नवदांपत्य सोयगाव देवी येथे आले.गावातील नातेवाईकांच्या उपस्थितीत २५ जून रोजी देवीदास बाबा यांच्या मठामध्ये नवदांपत्याचा दुसऱ्यांदा विवाह लावण्यात आला.दरम्यान,लग्नानंतर सोनी एकदा माहेरी जावून आली.परत आल्यानंतर तिने रावसाहेबांना मी पुन्हा एकटीच माहेरी जाते ,असे सांगितले. त्यानंतर ६ जुलै रोजी रावसाहेब सोनीला भोकरदन बसस्टॉप वर सोडायला गेले.एसटी स्टँडवर सोनीचा प्रियकर उपस्थित असल्याची बाब रावसाहेबच्या लक्षात आली.त्यामुळे रावसाहेबने याबाबतची माहीती पोलिसांना दिली. त्यानंतर भोकरदन पोलिसांनी नववधू सोनीला ताब्यात घेवून तिची चौकशी केली.सुरूवातीस सोनीने पोलिसांना गुंगवीले.मात्र सहायक पोलिस निरिक्षक रत्नदीप जोगदंड,राजाराम तडवी यांनी पोलिसीखाक्या दाखवताच सोनी भानावर आली.पैसे घेवून फसवणूक केल्याचे सोनीने कबूल केले.रावसाहेब सहानेयांच्या तक्रारीवरून नववधू सोनी वानखेडे सह इतर न ऊ जणांविरुद्ध भोकरदन पोलिसठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .सोनी वानखेडेला या फसवणुक प्रकरणी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.सोनी विवाहीत असून
तिला दोन मुली आहेत.तसेच या लग्नात आलेले नातेवाईकही बोगस असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे.