रावेर(शेख शरीफ)
गेल्या दोन वर्षापासून कोरोना महमारिच्या रोगा मुळे जगभरातील जनता त्रस्त झालेली होती. त्यामुळे कुठलेही धार्मिक कार्य भाविकांच्या उपस्थितीत घडून आलेले नव्हते.
परंतु यंदा सर्व काही निरोगी वातावरण असल्याने शासकीय बंदी शिथिल करण्यात आली असून यंदा दी;-१३ जुलै रोजी गुरुपौर्णिमा माहोत्सव परम पूज्य संत श्री लक्ष्मण चैतन्य बापूजी आश्रम वृन्दावन धाम पाल येथे अखिल भारतीय चैतन्य साधक परिवारातर्फे आणि विद्यमान पदस्थ श्रधेय संत श्री गोपाल चैतन्य जी महाराज यांच्या सनिध्यात गुरुपौर्णिमा माहोत्सव साजरा करण्यात येत असून तयारीला सुरुवात करण्यात आलेली आहे.
परम पूज्य सद्गुरु संत श्री लक्ष्मण चैतन्य बापूजी च्या समाधी दर्शनाकरिता श्री वृन्दावन धाम पाल येथे देशभरातून हजारो भाविक गुरुपौर्णिमा महोत्सव निमित्त येतात.तसेच शेकडो किलोमीटर हुन चैतन्य साधक परिवाराची पाई दिंडी सुद्धा येत असते. अश्या परिस्थितीत सध्या पावसा चे दिवस असल्याने त्यांच्या वाटरप्रोफ निवास, भोजन, तसेच सत्संग मंडप, समाधि दर्शन व्यवस्था,कीर्तन भजन,जलव्यवस्था, पार्किंग व्यवस्था, आरोग्य रुग्ण व्यवस्था, स्नान, आदि व्यवस्थे करिता गेल्या महिन्याभरापासुन साधक परिवार तसेच ब्रम्हचारी यांच्याकड़ू न तयारीला सुरुवात झालेली असून भाविकांच्या आगमनाकरिता पाल नगरी झालेली दिसून येत आहे . तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी याकरिता पोलिस तसेच इतर व्यवस्था जसे आगार , विद्युत , ग्रामीण रुग्णालय, ग्रामपंचायत,यांना निवेदन देण्यात आले असून तसेच सोशल डिस्टेसिंग पालन करण्याचे आवाहन चैतन्य साधक परिवारातर्फे करण्यात आले आहे.