Home परभणी गंगाखेडात नगरपालिकेकडून शहरवासीयांना गढूळ, दूषित पाणीपुरवठा आम आदमी पार्टीचे SDO ना निवेदन

गंगाखेडात नगरपालिकेकडून शहरवासीयांना गढूळ, दूषित पाणीपुरवठा आम आदमी पार्टीचे SDO ना निवेदन

111

 

गंगाखेड प्रतिनिधी
गंगाखेड नगरपालिकेपासून मागील चार महिन्यापासून सतत शहरवासीयांना दूषित व गढूळ पाणीपुरवठा होत आहे. आम आदमी पार्टीचे परभणी जिल्हा उपाध्यक्ष सखाराम बोबडे पडेगावकर यांच्या वतीने मंगळवारी (5 जुलै) उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन निवेदन देण्यात आले.
गंगाखेड शहराला दोन भागात पाणीपुरवठा केला जातो. जुन्या शहराला पाणीपुरवठा करणारी यंत्रणा गोदावरीच्या पात्रातच आहे. या नैसर्गिक फिल्टर मधून होत असलेल्या पाणीपुरवठ्यात मागील चार महिन्यापासून दूषित पाणी शहरवासीयांना मिळत आहे . शहरवासयांनी आजपर्यंत नगरपालिका प्रशासनाला वेळोवेळी भेटून तक्रारी केल्या. लेखी निवेदनही दिले. पण नगरपालिका मुख्याधिकारी फड यांना शहरवासीयांच्या महत्वाच्या मुद्याकडे लक्ष द्यायला वेळच नाही. निवडणुकीच्या कामाचे कारण सांगून मुख्याधिकारी इतर बाबीकडे दुर्लक्ष करत आहेत. दूषित पाणीपुरवठ्यामुळे शहर वाशीयाना वेगवेगळ्या आजारांना सामोरे जावे लागत आहे. प्रत्येक शहरवासीय फिल्टरचे पाणी विकत घेऊन पिऊ शकत नसल्यामुळे नगरपालिकेने स्वच्छ पाणीपुरवठा करावा अशी मागणी ही करण्यात आली आहे. उपविभागीय अधिकाऱ्यांनी आपल्या अधिकाराचा वापर करून संबंधितांना स्वच्छ पाणी पुरवठ्यासाठी आदेशित करावे अशी विनंती ही या निवेदनाद्वारे करण्यात आली. आगामी आठ दिवसात स्वच्छ पाणी पुरवठा सुरळीत न झाल्यास याच गढूळ पाण्याने नगरपालिकेसमोर मुख्याधिकाऱ्यांच्या खुर्चीस जलाभिषेक आंदोलन करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला. या निवेदनावर सखाराम बोबडे पडेगावकर ,सामाजिक कार्यकर्ते राहुल साबणे आदींच्या स्वाक्षरी आहेत.