जून 2022 परीक्षाच्या आयोजना बाबतीत केले समाधान व्यक्त
यवतमाळ :- यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक अंतर्गत शासन आदेशानुसार जून 2022 च्या ऑफ लाईन लेखी परीक्षा 24 जून पासून मान्यता प्राप्त परीक्षा केंद्रात सध्या सुरु असून. दोन वर्षाच्या कोरोना प्राधुर्भावा नंतर मुक्त विद्यापीठाच्या ऑनलाईन परीक्षा झाल्या होत्या. आता मात्र कोरोना प्राधुर्भावा संपुष्टात आल्यामुळे दोन वर्षाच्या प्रदीर्घ काळा नंतर शासनाने प्रत्यक्षात लेखी स्वरूपात परीक्षा घेण्यासाठी आदेश दिल्याने यवतमाळ जिल्यातील अनेक मान्यता प्राप्त अभ्यास केंद्रावर नेहमी प्रमाणे उन्हाळ्यात सुट्टीत असणाऱ्या मुक्त विद्यापीठाच्या लेखी परीक्षा आता शाळा, कॉलेज सुरु असतांना सुद्धा परीक्षा केंद्रे तारेवरची कसरत करून परीक्षा विद्यापीठ नियमानुसार सुरळीत सुरु असल्यामुळे मुक्त विद्यापीठाचे विभागीय संचालक प्रा. डॉ. संजय खडक्कार यांनी त्यांच्या पथकातील सदस्यांसोबत यवतमाळ जिल्ह्यातील अनेक परीक्षा केंद्रास प्रत्यक्षात भेट देऊन समाधान व्यक्त केले आहे. एकंदरीत सध्या यवतमाळ जिल्ह्यात मुक्त विद्यापीठाच्या लेखी परीक्षा शांततामय वातावरणात विद्यापीठ नियमानुसार सुरळीत पणे सुरु असल्यामुळे विद्यार्थी, पालक वर्गात समाधान व्यक्त होत आहे….