Home वाशिम चंद्रभागा नदीपात्रात दोन भावंडाना बुडतांना बचाव पथकाने दिले जिवदान

चंद्रभागा नदीपात्रात दोन भावंडाना बुडतांना बचाव पथकाने दिले जिवदान

152

 

वाशिम:-त्यांच्या जिवनातील शेवटचे काहीक्षण बाकी असतांनाच दोन्ही भावंडानी आता आपण बुडणार म्हणून एकमेकांना मिठी मारली अगदी कपाळापर्यंत बुडालेल्या अवस्थेत असतांनाच पिंजर जिल्हा अकोला येथील मानवसेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशनच्या संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाच्या जवानांनी चक्क मृत्यूच्या दाढेतुन खेचुन काढले.यावर्षी बचाव पथकाने एकुण पाच जनांना जिवनदान दिले.


इस्काॅन घाटाच्या डाव्याबाजूला नदीच्या काठावर उभे असलेले वारकरी आरडाओरडा करत धावा धावा असे जोर जोरात ओरडु लागले. लगेच तेव्हा जिवरक्षक दीपक सदाफळे आणी टीम यांनी मागे पाहताच दोन भाऊ चंद्रभागा नदीच्या मध्यभागातुन पोहत येत असतांना मधातच दम सरला आणी दोघेही बुडायला लागले खुप प्रयत्न करत होते परंतु शेवटी तीथेच दम सरल्याने दोघांनाही गटांगळ्या खायला सुरवात झाली याच वेळी आता आपले काही खरे नाहीं अशी खात्री होताच दोघाही भावंडानी एकामेकांना मिठ्या मारुन पकडले तेव्हा कोणी मदतीला धावून येईल तरच आपण जिवंत राहु अशी परीस्थिती त्यांच्या हालचाली वरुन जानवत होती.अगदी जिवनातील शेवटचे काही क्षण व सेकंद बाकी अण शेवटच्या क्षणीच वारक-यांच्या रक्षणासाठी तैनात असेले संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे जवान दोन्ही भावंडे बुडतांनाच्या अवस्थेत खाली जाताच त्यांच्या दिशेने झेप घेत नदिपाञात ऊड्या मारल्या आणी चक्क मृत्यूच्या दारातुन दोघांनाही सुखरुप ओढुन काढले.”नेहमी प्रमाणे अशी केली जिवरक्षकांनी इमर्जन्सी प्लानिंग” क्षणातच जिवरक्षक दिपक सदाफळे यांनी आपली रेस्क्यु बोट त्या दीशेने वळविली आणी लगेच अंडर वाॅटर स्विमर पथकाचे जवान ज्ञानेश्वर म्हसाये,अतुल उमाळे, यांना स्टॅण्डबाय होऊन पोजिशन घ्यायला सांगितले.आणी दुसरे बोट मधील न.ग.प.चे कर्मचारी प्रज्वल प्रचंडराव यांना दोन लाईफरींग घेऊन त्या भावंडांजवळ फेकण्यासाठी पोजिशन घ्यायला सांगितले. आणी लगेच अवघ्या एका मिनटात त्या भावंडांजवळ रेस्क्यु बोट नेत ना नेत लगेच त्या दिशेने लाईफ रींगा फेकल्या आणी क्षणार्धात दोन्ही स्विमरला जिवरक्षक दीपक सदाफळे यांनी जंम्प अटॅक असे म्हणताच त्या दिशेने टाॅपर स्विमर यांनी अगदी तुटुन पडल्या सारखी झेप घेऊन पाच सेकंदात डोक्यापर्यंत बुडालेल्या अवस्थेत आणी त्या भावंडाच्या चक्क जिवणाचे शेवटचे काही सेकंद बाकी असतांनाच मृत्यूच्या दाढेतुन त्यांना बाहेर काढले आणी यावेळी उभ्या असलेल्या वारक-यांच्या मुखातुन एकच आवाज गुंजला जय हरी विठ्ठल माऊली. लगेच दिपक सदाफळे जिवरक्षक यांनी दोन्ही भावंडांना सुरक्षितपणे बोट मध्ये घेतले.नंतर वाळवंट EOC मदत केंद्रात नेऊन तहसीलदार चव्हाण यांच्या समोर सादर केले यावेळी या भावंडांनी जितेंद्र अजयकुमार कहाळ वय अंदाजे (22) वर्ष मी आणी माझा भाऊ अभिजीत अजयकुमार कहाळ ता.विरार पालघर मंगलमुर्ती अपार्टमेंट मुंबई चे असल्याचे सांगितले.यावेळी अगदी भावनीक होऊन EOC वाळवंट अधिकारी यांना सांगितले की संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे जवान आज आमच्यासाठी देवदुत ठरले आहेत.आणी दोन्ही भाऊ एकदम ठणठणीत व पुर्णपणे सुरक्षित असल्याने EOC वाळवंट येथील डाॅक्टरांनी तपासून घेताच दोन्ही भाऊ पुर्णपणे ठणठणीत असल्याचे सांगताच दोन्ही भावांनी हात वर करत बचाव पथकातील जवानांना मिठ्या मारल्या आणी संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचा विजय असो असे म्हणताच. “न जाने ईस परीवार में हमने आँसुओ की जगह खुशियां लौटादीया” याच क्षणी याच रुपात खुपकाही कमावल्याचे समाधान बचाव पथकाला वाटले. यावेळी मिलींद शंभरकर जिल्हाधिकारी सोलापुर, यांनी मा.आ.व्य.फां.संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख जिवरक्षक दीपक सदाफळे यांच्या उत्कृष्ट आपत्ती व्यवस्थापनाचे तोंडभरुन कौतुक केले आणी सर्व सेवकांना शाबासकी थाप देऊन भरभरून शुभेच्छा दिल्या.यावेळी सोबत गजानन गुरव सर उपविभागीय अधिकारी पंढरपूर,अरविंद माळी सर न.प.सीईओ.सुशिल बेल्हेकर सर तहसीलदार पंढरपूर,राजेश चव्हाण सर तहसीलदार माढा ईओसी वाळवंट, जिमाका मा.अ.सोलापुर हे चंद्रभागानदी वाळवंटात राऊंड दरम्यान उपस्थित होते. मानवसेवा सामाजिक विकास कार्य व आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशनच्या संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे (जिवरक्षक) यांच्या नेतृत्वात पथकाची एक रुग्णवाहिका आणी सर्च ॲण्ड रेस्क्यु ऑपरेशन सोईसुविधांसह आपात्कालीन वाहन व शोध आणी बचाव साहीत्यांसह आपत्ती व सुरक्षा व्यवस्थापन जिवरक्षक व रुग्णसेवा सेवा देण्यासाठी पथकाचे स्वयंसेवक ज्ञानेश्वर म्हसाये,अतुल उमाळे, ऋषीकेश राखोंडे,मयुर सळेदार, ऋषीकेश तायडे,उमेश बिल्लेवार,अजय डाके, मयुर कळसकार,विकी साटोटे,सुरज ठाकुर, निखील ठाकरे,राम काकड,विकी पिंजरकर, शिवम वानखडे,शुभम भोपळे,अंकुश चांभारे, मुन्ना अंधारे,अक्षय ठाकरे,सार्थक वानखडे, गोविंदा ढोके,या जवानांसह पंढरपूरात ही रेस्क्यु टीम सेवा देत आहेत.अशी माहिती पथक प्रमुख दीपक सदाफळे यांनी दिली आहे.

प्रतिनीधी:-फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206