Home उत्तर महाराष्ट्र गंभीर गुन्ह्यातील व जबरी चोरीच्या गुन्ह्यामध्ये मागील नऊ वर्षापासून फरार अट्टल गुन्हेगाराच्या...

गंभीर गुन्ह्यातील व जबरी चोरीच्या गुन्ह्यामध्ये मागील नऊ वर्षापासून फरार अट्टल गुन्हेगाराच्या मुसक्या फलटण ग्रामीण पोलीसांनी आवळल्या

156

 

(फलटण :- अनिल पवार)

गंभीर गुन्ह्यातील व जबरी चोरीच्या गुन्ह्यामध्ये मागील नऊ वर्षापासून फरार अट्टल गुन्हेगाराच्या मुसक्या फलटण ग्रामीण पोलीसांनी आवळल्या. श्री.गोडसे यांनी फलटण ग्रामीणचा पदभार घेतल्यापासून सातत्यपूर्ण कामगिरी सुरुच आहे गोडसे हे संवेदनशील व कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून परीचीत आहेत .फलटण ग्रामीण पोलीस ठाणे. गु. र. नं. १९/२०१४ भा. दं. सं. कलम ३९२ ३४ या गुन्ह्यातील फिर्यादी व साक्षीदार हे व्यवसायाने ट्रक ड्रायव्हर व क्लिनर असून ते त्यांचा मालट्रक घेऊन दि. २०/०१/२०१४ रोजी पहाटे ०४.१५ वा. चे सुमारास फलटण- पंढरपूररोडने जात असताना वाजेगाव, पोस्ट – निंबळक, ता. फलटण येथील एस. टी. स्टॅण्डजवळ गाडीमध्ये पाणी भरण्यासाठी थांबले होते. त्यावेळी चार अनोळखी आरोपींनी त्यांना चाकुचा धाक दाखवुन त्यांचेकडील रोख १०,०००/-रु. व एक मोबाईल हॅण्डसेट जबरदस्तीने चोरुन नेल्याबाबतच्या तक्रारीवरुन वरील प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता. प्रस्तुत गुन्ह्याचे तपासामध्ये आरोपी १) गुलजार उर्फ महेंद्र मिस्टींग्या काळे वय २२ वर्ष, रा. बावडा, ता. इंदापूर, जि. पुणे २) डुब्ल्या छबु काळे वय २८ वर्ष, रा. फोंडशीरस, ता. माळशिरस, जि. सोलापूर ३) जॉकी डाय-या पवार वय २४ वर्ष, रा. भिमनगर, धर्मपुरी, ता. माळशिरस, जि. सोलापूर ४) लखन डाय-या पवार, रा. भिमनगर, धर्मपुरी, ता. माळशिरस, जि. सोलापूर यांची नावे निष्पन्न होऊन गुलजार उर्फ महेंद्र मिस्टींग्या काळे, डुब्या छबु काळे व जॉकी डाय-या पवार यांना अटक करून चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. परंतु आरोपी लखन डाय-या पवार हा सन २०१४ पासून फरार होऊन वेळोवेळी राहण्याची ठिकाणे बदलुन मोबाईल हॅण्डसेटचा वापर न करता पोलीसांना गुंगारा देत होता. श्री अजय कुमार बंसल, पोलीस अधीक्षक, सातारा श्री अजित बो-हाडे, अपर पोलीस अधीक्षक, सातारा व श्री तानाजी बरडे, उपविभागीय पोलीस अधिकारी, फलटण उपविभाग यांनी सराईत व अट्टल गुन्हेगार लखन डाय-या पवार, रा. भिमनगर धर्मपुरी, ता. माळशिरस, जि. सोलापूर यास लक्ष करुन पकडण्याच्या सूचना धन्यकुमार गोडसे, पोलीस निरीक्षक, फलटण ग्रामीण पोलीस ठाणे यांना दिल्या होत्या. त्यानुसार पो. नि. धन्यकुमार गोडसे यांच्या अधिपत्याखाली तपास पथकास दि. १५/०७/२०२२ रोजी आरोपी लखन डाय-या पवार, रा. भिमनगर, धर्मपुरी, ता. माळशिरस, जि. सोलापूर हा मुंजवडी, ता. फलटण या ठिकाणी असल्याची माहिती प्राप्त झाली. त्यावरुन तपास पथकाने सदर ठिकाणी जाऊन गोपनीय बातमीदारामार्फत त्याच्या ठावठिकाण्याची अचुक माहिती काढुन सापळा लावुन त्यास ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता तो त्यावेळी पडणा-या मुसळधार पावसाचा गैरफायदा घेत बाजुच्या ऊसाचे शेतात पळू लागला. परंतु तपास पथकातील अधिकारी व अमलदार यांनी अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत ऊसाचे शेतात घुसून गुडघाभर चिखलातून त्याचा पाठलाग करुन त्यास ताब्यात घेतले आहे. श्री अजय कुमार बंसल, पोलीस अधीक्षक, सातारा, श्री अजित बो-हाडे, अपर पोलीस अधीक्षक, सातारा व श्री तानाजी बरडे, उपविभागीय पोलीस अधिकारी, फलटण उपविभाग यांच्या सूचनेप्रमाणे धन्यकुमार गोडसे, पोलीस निरीक्षक, फलटण ग्रामीण पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे, पोलीस उपनिरीक्षक सागर अरगडे, पोलीस अमंलदार सुधाकर सूर्यवंशी, दादासाहेब यादव, महेश जगदाळे व गणेश अवघडे यांनी सदरची कारवाई केलेली आहे.