(अयनुद्दीन सोलंकी)
घाटंजी : घाटंजी येथील औधोगिक प्रशिक्षण संस्थेत जागतिक युवा कौशल्य दिन साजरा करण्यात आला. त्या निमित्ताने कायदेविषयक ज्ञानदान शिबिर संपन्न करण्यात आले.
15 जुलै रोजी आयोजित करण्यात आलेल्या
कायदेविषयक ज्ञानदान शिबिरासाठी प्रमुख पाहुणे व वक्ते म्हणून दिवाणी न्यायाधीश, प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी घाटंजी तथा अध्यक्ष तालुका विधी सेवा समितीचे न्यायाधीश ए. ए. उत्पात, दिवाणी न्यायाधीश तथा प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी ए. ए. कळमकर, घाटंजी तालुका वकील संघाचे अध्यक्ष ॲड. अनंतकुमार पांडे, न्यायालयीन कर्मचारी विठ्ठल वाघाडे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य प्रवीण गुल्हाने होते.
उपस्थित मान्यवरांनी संस्थेतील प्रशिक्षणार्थ्यांना तस्करीचे बळी, व्यावसायिक, लैंगिक शोषण योजना २०१५, सार्वजनिक उपयोगिता सेवा केंद्र सरकार आणि राज्य सरकार योजना, मुलांचे हक्क, शिक्षणाचा अधिकार, बेटी बचाओ बेटी पढाओ, बाल न्याय (बालकांची काळजी आणि संरक्षण) कायदा २०१५ आणि पोक्सो कायदा, सायबर गुन्हे ईत्यादी मुद्द्यावर मार्गदर्शन केले.
मार्गदर्शन व आभार प्राचार्य प्रवीण गुल्हाने यांनी मानले. संचालन पी. के. जयशिंगकार यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपलेंचवार सर, निमट सर, रंजित नगराळे, राणे सर, शेवतकर सर, लाकडे सर, घोडमारे सर, ढवळे सर व झेंडे मॅडम आदींनी परिश्रम घेतले.