जालना- लक्ष्मण बिलोरे
शेतात उघड्यावर शौचास बसण्यास विरोध केल्याच्या क्षुल्लक कारणावरून मायलेकराचा निर्घृण खून झाला.जालना तालुक्यातील एरंडवडगाव – अचानक तांडा येथील खळबळजनक घटना शुक्रवारी, १५ जुलै रोजी घडली.या प्रकरणात दहा आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.जालना तालुक्यातील एरंडवडगाव शिवारात असलेल्या अचानक तांडा येथे देविलाल सिल्लोडे यांची गावालगत शेती आहे. या शेतात गावातील काही मुले सराईत चोरटे असून ,ते रात्री चोऱ्या करून आल्यावर लपून बसत.याच शेतात शौचाला बसत असत .याला सिल्लोडे कुटुंबातील सदस्यांचा विरोध होता.शुक्रवारी आठच्या सुमारास शेतात शौचास बसण्यास त्यानी विरोध केल्याच्या कारणावरून सिल्लोडे यांच्या कुटुंबाला दहा जणांच्या टोळक्याने बेदम मारहाण केली आणि चाकून भोसकले .यामध्ये गंभीर जखमी झालेल्यांना तातडिने जालना येथील जिल्हा सरकारी रूग्णालयात हलविण्यात आले होते.सुमनबाई देविलाल सिल्लोडे (वय ५५ ),आणि मंगेश देविलाल सिल्लोडे ( वय २५ )या मायलेकराचा रस्त्यातच मृत्यू झाला.तर देविलाल सिल्लोडे,आणि योगेश सिल्लोडे यांची प्रकृती गंभीर असून जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहे.
सेवली पोलिसांनी विजय शिंदे,सुधाकर शिंदे,शितल शिंदे ,तुकाराम शिंदे,मुंगळ्या भोसले,छकुली शिंदे,रंजना पवार, सुरेखा शिंदे,चिंटू शिंदे आणि एक व्यक्ती अशा दहा जणांविरुद्ध शनिवारी पहाटे गुन्हा दाखल केला आहे.घटनेची माहिती कळताच अप्पर पोलिस अधीक्षक विक्रांत देशमुख,परतुर उपविभागिय पोलिस अधिकारी राजू मोरे ,मौजपुरीचे सपोनि.एनएन उबाळे,परतुरचे पोलिस उपनिरीक्षक कमलाकर अंभोरे यांनी रात्रीच तातडिने घटनास्थळी भेट दिली.