(अयनुद्दीन सोलंकी)
घाटंजी : घाटंजी तालुक्यात अतिवृष्टीने थैमान घातले असून पावसाच्या अतिरेकाने डोळ्या देखत पिके उध्वस्त होतांना दिसत आहे. कसे बसे सावकार व बॅंका कडून कर्ज घेऊन शेती करायची आणि आपला संसाराचा गाडा हाकत जायचं, असे चक्र चालू असतांना हे खरिपाचे वर्षे मात्र शेतकऱ्यांसाठी कर्दनकाळ ठरत आहे. सुरूवातीला अपुऱ्या पावसामुळे तालुक्यातील हजारो एकर मधल्या पेरण्या उलटल्या. शेतकऱ्यांना दोन तीन वेळा टोबनी / पेरणी करावी लागली. जेम तेम पिके जुळल्याने शेतकरी समाधान व्यक्त करतानांच अतिवृष्टीने तालुक्यात कहर केला आहे, अनेक शेतकऱ्यांचे पिके खरडून गेली तर हजारो हेक्टर जमीनीमधील पिके अक्षरशः चिबडून गेली आहेत. शेकडो एकर शेतजमीनीत पाणी साचलेले आहे. केवळ बोटा एवढी पिकांची वाढ झाली नसतांना पावसाचा सातत्याने उद्रेक सुरू आहे. परिणामी शेतकऱ्यांच्या उत्पादनावर याचा मोठा परिणाम होणार आहे. हा विषय शेतकऱ्यांच्या जीवन मरणांशी निगडित असून कोणताही विलंब न करता महसूल व कृषी विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन अधिकाऱ्यांनी पंचनामे करावे, जेणे करून प्रशासनाला शेतकऱ्यांची विदारक परिस्थिती माहीती पडेल, अशा आशयाचे निवेदन तहसीलदार पुजा मातोडे यांना घाटंजी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष मोरेश्वर वातीले, रमेश धुर्वे, संजय ढगले, डॉ. अरविंद तोडसाम, बंडू तोडसाम, विश्वास निकम, प्रसाद वाढई, प्रफुल्ल राऊत, विश्वनाथ जाधव, संजय जाधव, संतोष राठोड, निकेश वातीले, अमोल गेडाम, राहुल वराटे, सागर भोगेकर, श्रीधर राठोड, गजानन ढवस, देवराव ढाले, पंकज मांडवगोडे, राजु ढवस, गुणवंराव निकम सह असंख्य कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते.