Home यवतमाळ ” जिंकु किंवा मरु ” आंदोलनामुळे अधिकाऱ्यांसह राजकीय पुढाऱ्यांमध्ये सुद्धा हडकंप…!

” जिंकु किंवा मरु ” आंदोलनामुळे अधिकाऱ्यांसह राजकीय पुढाऱ्यांमध्ये सुद्धा हडकंप…!

164

 

यवतमाळ ( प्रतिनिधी ) वर्धा – यवतमाळ – नांदेड नवनिर्मित रेल्वे प्रकल्पाच्या उत्खननातील गौणखनीज भ्रष्टाचार सध्या राज्यभर चर्चेचा मुद्दा होत आहे आणि या प्रकरणातील भ्रष्ट अधिकारी यांच्या चौकशीची कंत्राटदार / उपकंत्राटदार यांचेवर त्वरीत गुन्हे दाखल करण्यासाठी तक्रारदार पत्रकार अमोल कोमावर यांना न्याय देण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र व्यापी आंदोलन यवतमाळ येथे होणार आहे

याचा इशारा मिळाल्यामुळे भ्रष्ट , दोषी अधिकाऱ्यांवर यवतमाळ येथील त्यावेळेस पदावर असलेल्या राजकीय पुढाऱ्यांमध्ये सुद्धा हडकंप सुटलाय . सविस्तर वृत्त असे की , वर्धा – यवतमाळ – नांदेड नवनिर्मित रेल्वे प्रकल्पाच्या उत्खननातील गौणखनीज उपकंत्राटदार मुथा , ईश्वर व अन्य उपकंत्राटदाराने राजरोसपणे राज्य • सरकारच्या व रेल्वे विभागाच्या संबंधीत काही भ्रष्ट अधिकाऱ्यांशी हातमिळवणी करून आर भरत रेड्डी या रेल्वे कंत्राटदाराने करोडो रुपयाचा गौणखनीज विकला ह्या संबंधातील तक्रार नॅशनल युनियन ऑफ जर्नलिस्ट चे राज्य सचिव अमोल कोमावार यांनी संबंधीत खात्याच्या वरिष्ठांना याबाबत सविस्तर तक्रारीसह मुथा यांच्या गाड्या ( ट्रक ) सुद्धा पकडून दिलेत परंतू तहसिलदार यवतमाळ व जिल्हा खनिकर्म अधिकारी त्यावेळचे श्री . राजेंद्रगीर गोसावी यांनी हेतुपुर्वक या तक्रारीकडे दुर्लक्ष केले व पुन्हा पुन्हा तक्रारी केल्यामुळे व तक्रारदार अमोल कोमावर यांच्या उपोषणामुळे घाबरून गेले व कुणाल झाल्टे तहसिलदार , यवतमाळ , जिल्हा खनिकर्म अधिकारी राजेंद्रगीर गोसावी , उपकंत्राटदार श्री . अमित मुथा व त्यांचे अन्य सहकारी मिळून कट रचून प्रकरण दडपण्यासाठी प्रचंड दबाव तक्रारदारावर आणला एवढेच नाही तर त्याला संपवण्यासाठी सुद्धा सर्व प्रयत्न केले . तसेच वेगवेगळ्या प्रकरणात अडकविण्याचा प्रयत्न केला . महसूल विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सुद्धा त्यांची पाठराखण करून भ्रष्टाचाराला खतपाणी घातले . अतिशय महत्त्वाचे म्हणजे मंत्र्यांनी सुद्धा हे प्रकरण दडपण्याचाच प्रयत्न केला . गेल्या तीन वर्षात शिवसेनेचे वादग्रस्त त्यावेळचे पालकमंत्री मा.ना. संजय राठोड व त्यानंतर मा . श्री . संदिपान भुमरे यांना सुद्धा तक्रार / निवेदन दिले परंतू संबंधीत सरकारी अधिकारी मोठमोठ्यांना त्वरीत गोंधळात टाकतात . एवढेच नाही तर कुणाल झाल्टे व तहसिलदार यवतमाळ यांनी कितीतरी वेळो चक्क जिल्हाधिकाऱ्यांना मुर्ख बनविण्याचे सुद्धा तक्रारदाराने रितसर जिल्हाधिकारी , यवतमाळ यांना एका पत्राद्वारे कळविले . नॅशनल युनियन ऑफ जर्नलिस्ट चे राज्य सचिव , तक्रारदार अमोल कोमावर यांच्या सतत पाठपुराव्यामुळे रेल्वे विभागाकडून ३० करोड रुपये रॉयल्टी राज्य सरकारच्या महसूल विभागाला मिळाली . परंतू ही रॉयल्टी रेल्वे कंत्राटदाराने खाजगी जमिनीतून गौणखनीज ( Pitching ) दबाई साठी वापरण्याकरीता घेतल्याची आहे आणि तक्रार ही कापण्या ( Cutting ) मधून निघालेल्या गौणखनीजाला विकल्याची आहे . परंतू यातले त्यात करून संबंधीत भ्रष्ट , दोषी , आरोपी , अपराधी अधिकारी हे पळवाट , वेळ मारुन नेण्यासाठी वरिष्ठांना भ्रमात टाकुन गोंधळून टाकतात व नंतर ओली पार्टी , अन वजनदार पाकीट बाकी विषय संपला असा हा खेळ चाललेला आहे .
परंतू या संपूर्ण प्रकरणाला प्रकाशात आणून सर्व दोषींवर सक्त कठोर कारवाईसाठी नॅशनल युनियन ऑफ जर्नलीस्टचे राज्य अध्यक्ष मा . श्री . उदय जोशी यांच्या मार्गदर्शनात नॅशनल युनियन ऑफ जर्नलीस्ट व महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने संपूर्ण राज्यव्यापी “ जिंकु किंवा मरु ” आंदोलनाचे बिगुल वाजविल्याने अर्थात फक्त आंदोलनाच्या इशाऱ्यानेच भ्रष्ट सरकारी अधिकाऱ्यात हडकंप सुटल्याचा प्रत्यक्षदर्शी अनुभवास मिळत असून भ्रष्ट अधिकारी नाना प्रकारचे प्रयत्न बदली , सुट्टी , करीत असल्याचे तसेच काही तर अगदि मंत्र्याचे उंबरठे गाठण्यापर्यंत “ वाचवा हो वाचवा ” चा टाहो फोडतांना निदर्शनास येत आहे . एवढेच नाही तर शिवसेनेच्या दुफळी राजकारणामुळे यवतमाळला त्यावेळेसच्या पदस्थ मंत्र्यांमध्ये सुद्धा हडकंप सुटल्याचे ऐकण्यात येत आहे . “ जिंकु किंवा मरु ” ह्या राज्यव्यापी आंदोलनामुळे ह्या संपूर्ण करोडो रुपयाच्या गौणखनीज घेटाळ्याची संपूर्ण भ्रष्टाचार मालीकेची यवतमाळच्या इतिहासात नोंद होईल हे निश्चित .