देऊळगाव मही मध्ये सर्कल मधील पेंटर बांधवांना शासनाच्या सर्व सवलती मिळवून देणार जिल्हाध्यक्ष सुरेश भाऊ इंगळे
प्रतिनिधी:( रवि आण्णा जाधव )
देऊळगाव मही:- येथे पेंटर संघटनेच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीला मार्गदर्शक म्हणून संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुरेश भाऊ इंगळे हे होते या कार्यक्रमाला देऊळगाव मही व परिसरातील सर्व पेंटर बांधव हजर राहून त्यांनी आपल्या अडीअडचणी व इतरांबद्दल कामाचे कमी जास्त दरात घेतलेले भाव यावर रीतसर चर्चा करून यापुढील सर्व कामे नियोजनबद्ध व प्रत्येकाला परवडेल अशा दरात करायचे ठरले व सर्वांनी याला सहमती दर्शवून पाठिंबा दिला , पेंटर बांधवांना शासनाच्या सर्व सवलती मिळून देऊन प्रत्येकाच्या कामाची जबाबदारी ही शासनाची आहे त्यासाठी शासनाला रोजगार म्हणून प्रत्येक पेंटर बांधवाला 21 दिवसाची मजुरी उपलब्ध करून द्यावी किंवा पंधरा दिवसाच्या रोजंदारीचा पैसा पेंटर बांधवांच्या खात्यात जमा करावा अशा प्रकारचे आश्वासन दिले प्रत्येक पेंटर बांधवांनी कामगार कल्याणचे नाव नोंदणी करून लाभ घ्यावा असेही सांगितले पेंटर संघटनेचे ध्येय धोरण याविषयी मार्गदर्शन करून सर्वांनी एकत्र येऊन संघटनेला सहकार्य करावे असे सांगण्यात आले व सर्वांनूमते तालुका कार्यकारणी गठीत करून तालुकाध्यक्षपदाची निवड करण्यात आली यामध्ये तालुकाध्यक्षपदी रवि भाऊ गुमलाडू तर उप तालुका अध्यक्षपदी राहुल भाऊ गाडेकर यांचे नियुक्ती करण्यात आले. शहरध्यक्षपदी सुनील भाऊ हिवाळे तर उपशहर अध्यक्षपदी भगवान नाडे व सचिव अनिल भाऊ बनसोडे कोषाध्यक्ष अनिल भाऊ नागरे ,सल्लागार आर्ट संजय भाऊ राठोड तर सहसल्लागार सुधाकर भाऊ बनसोडे व प्रसिद्धी प्रमुख म्हणून विष्णू तळेकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली या कार्यक्रमासाठी पेंटर सुनील गुमलाडू, राजू मरमट ,अनिल बनसोडे ,लक्ष्मीकांत शिंगणे, रमेश नाडे ,राजेश तेजनकर ,सोनू पेंटर, शिवहरी धामणे, शिंगारे पेंटर ,पिंटू शहाणे, असे बरेच पेंटर हजर होते कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी चाय नाश्ता घेऊन आनंदाने कार्यक्रम संपला असे जाहीर केले