Home यवतमाळ ग्रामसेवक उत्तम मसराम यांची 94 हजार रुपयाची फसवणुक केल्या प्रकरणी अज्ञात आरोपी...

ग्रामसेवक उत्तम मसराम यांची 94 हजार रुपयाची फसवणुक केल्या प्रकरणी अज्ञात आरोपी विरुद्ध घाटंजी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल..!

128

(अयनुद्दीन सोलंकी)
घाटंजी, 7 ऑगस्ट – घाटंजी शहरातील पालतेवार ले – आऊट मधील रहिवासी ग्रामसेवक उत्तम हरिभाऊ मसराम यांच्या घराचा वीज पुरवठा खंडित करण्याचे भिती दाखवून अज्ञान आरोपीने फसवणूक केल्या प्रकरणी अज्ञात आरोपी विरुद्ध घाटंजी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी उत्तम मसराम याला मोबाईल क्रमांक +916200985003 या क्रमांका वरून व्हॉटसअँप संदेश आला. त्यात वीज वितरण कंपनीचा मोबाईल क्रमांक 7735880601 असल्याचे नमूद होते. रविवारी म्हणजे आज घराचा वीज बिलाचा भरणा केला नाही, तर आज आपल्या घराचा वीज पुरवठा खंडीत करण्यात येईल, असा फिर्यादीच्या व्हाॅटसॲप वर संदेश आला. त्यामुळे फिर्यादी हा घाबरुन गेला. ग्रामसेवक उत्तम मसराम हे बाहेरगावी असल्यामुळे घराचा वीज पुरवठा खंडित होणार या भितीने संदेश मध्ये नमूद असलेल्या मोबाईल क्रमांकावर फोन केला असता, पुढुन मी राकेश शर्मा बोलत आहे, असे सांगितले. फिर्यादी उत्तम याने ATM द्वारे ऑनलाईन रक्कम भरतो असे सांगितले होते. परंतु ऑनलाईन पेमेंट होत नसल्याने त्यांनी फिर्यादीला एक अँप डाउनलोड करण्यासाठी सांगितले. त्या नुसार सर्व प्रक्रिया करुन फिर्यादीच्या खात्यातून रक्कम रुपये 94,337/- परस्पर काढण्यात आले. या प्रकरणी फिर्यादी उत्तम मसराम यांच्या तक्रारीवरून घाटंजी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरुद्ध ऑनलाईन आर्थीक फसवणुक केल्या प्रकरणी भादंवि 420 फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर प्रकरणाचा पुढील तपास घाटंजी पोलीस ठाण्याचे ठाणेदार तथा पोलीस निरीक्षक मनीष दिवटे हे करीत आहे.