बिरसा मुंडा यांनी आदिवासी समाजाला विकासाच्या प्रवाहात आणले
वाशिम: आदिवासी समाजाच्या उत्थानासाठी बिरसा मुंडा यांनी आपले जीवन अर्पण केले असून ते प्रेरणादायी आहे. त्यांच्या कार्याची तुलना करता येत नाही. बिरसा मुंडा यांनी आदिवासी समाजाला जागृत करण्याचे कार्य करून विकासाच्या प्रवाहात आणले. त्यांचे हे कार्य अविस्मरणीय आहे. आदिवासी समाजाच्या सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक विकासासाठी शासनही सकारात्मक असल्याचे प्रतिपादन दि.९ आॅगष्ट रोजी मंगरुळपीर येथील अविनाश विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.विष्णु अगुलदरे सर यांनी जागतिक आदिवासी दिनानिमित्तच्या मंगरुळपीर येथील क्रांतिकारक बिरसा मुंडा स्मारकाजवळ झालेल्या कार्यक्रमप्रसंगी व्यक्त केले.बिरसा मुंडा यांच्या जयंती निमित्त जनजातीय गौरव दिनाचे आयोजन दि.९ आॅगष्ट रोजी मंगरुळपीर येथील क्रांतीकारक बिरसा मुंडा स्मारक येथे करण्यात आले होते. यावेळी आदिवासी बांधवांना संबोधित करतांना श्री.विष्णु अगुलदरे सर बोलत होते.
या कार्यक्रमास शेकडो समाजबांधवांनी बिरसा मुंडा यांच्या कार्याला अभिवादन केले.आदिवासी समाज कष्टाळू आणि प्रामाणिक आहे. देश निर्माणासाठी आदिवासी बांधवांचा मोठा सहभाग आहे. आदिवासी समाजाची एक स्वंतत्र जीवनशैली आहे तसेच रुढी, प्रथा, परंपरा आहेत त्यांची जपवणूक केली पाहिजे. आदिवासी बांधवांच्या पारंपरिक व्यवसाय, शेती यांना चालना दिली तर दुर्गम भागात राहणारा हा समाज प्रगती करेल अशी आशा यावेळी श्री.अगुलदरे यांनी व्यक्त केली.
आदिवासी समाजाने शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात येवुन बाबासाहेबांनी सांगीतल्याप्रमाणे मोक्याच्या जागा पटकवा तसेच महिलांनी विविध रोजगारातुन आर्थिक ऊन्नती साधुन समाजाच्या विकासासाठी हातभार लावावा असे राज्यस्तरीय सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार प्राप्त तसेच पुनम शिवणकला केंद्राच्या संचालिका सौ.महानंदा अगुलदरे यांनी आपले मत व्यक्त केले.
प्रतिनीधी:-फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206