प्रतिनिधी:-( रवि आण्णा जाधव )
देऊळगाव राजा:-गेली सलग एक महिन्या पासून संपुर्ण महाराष्ट्रात पाऊस सुरू असून शेतकऱ्यांनी शेती मशागतीसाठी केलेला खर्च व बी-बियाणे,औषधी, खते,पेरणी,मजुरी असा भरपूर खर्च केला असून या वर्षी पिके सुद्धा चांगली भहरू लागली परंतु गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे संपूर्ण पिके हातातून गेली आहे यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे,त्यामुळे शासनाने तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांच्या खात्यात एकरी ५००००/- रुपये तात्काळ जमा करावे,अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने १५/०८/२०२२ रोजी आपल्या तहसील कार्यालया समोर अर्ध नग्न आंदोलन करण्यात येईल , व होणाऱ्या परिणामास प्रशासन जबाबदार राहील,या मागणीसाठी आज दिनांक.०८/०८/२०२२ रोजी देऊळगाव राजा तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.या वेळी निवेदन देतांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा जिल्हा अध्यक्ष सतीश मोरे, जिल्हा सरचिटणीस जुल्फिकार सेट,सि-राजा विधानसभा अध्यक्ष मधुकरराव शिंगणे, देऊळगाव राजा ता.अध्यक्ष गणेश शिंगणे, स्वाभिमानी नेते वसंतराव दहातोंडे,सुदाम भाऊ शिंगणे, तसेच परिसरातील शेतकरी उपस्थित होते.