पत्नीच बनली खलनायिका केली पतीची हत्या…!
प्रतिनिधि – विनोद महाजन
वर्धा – दोन दिवसा अगोदर रेल्वे परिसरात मिळालेले अज्ञान ईसमाचे अर्धवट जळालेले मुंडके मिळाल्याने संपूर्ण परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते, तीन दिवस होऊन सुद्धा धड़विरहित मुंडके कोणाचे याबाबत रेल्वे पोलिस झाले होते हतबल.
विरुळ आकाजी…!
पुलंगाव येथील रेल्वे स्टेशन परिसरात दि 6/8/2022 रोजी रेल्वे पोलिसांना अर्धवट धड रहित पुरुष जातीचे मुंडके मिळाले याबाबत रेल्वे पोलीसांनीं अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. परंतु तीसरा दिवस उलटून सुद्धा मुंडके कोणाचे याबाबत तपास न लागल्याने पुलगांवकरांच्या मनात रेल्वे पोलिस व पोलिस प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाला होता.याबाबत पुलंगाव पोलिसांनासुद्धा माहिती देण्यात आली होती.
तेव्हा धड रहित मुंडके हे कोणाचे आहे याबाबत तपास करीत पोलिसांनासुद्धा प्रश्न चिन्ह निर्माण झाला होता. म्हणुन पुलंगाव पोलीस स्टेशन चे कर्तव्यदक्ष थानेदार श्री. शैलेश शेळके यांनी अधिनस्त असलेल्या दोन्ही डी.बी. पथकांना योग्य मार्गदर्शन करून अर्धवट जळालेल्या मुंडक्याचे ओळख पटविण्याकरिता आदेशीत केले. यावरून पोलीस स्टेशन चे डीबी- 1 पथक प्रमुख राजेंद्र हाडके यांचे पथकातील पंकज टाकोणे, संजय पटले, शरद सानप यांना अर्धवट जळालेल्या मुंडक्याचा छडा लावण्यात यश आले.
मिळालेल्या माहितीनुसार हिंगणघाट फैल पुलंगाव येथील मृतक अनिल मधुकर बेंदले वय 49 वर्षे हा तिन ते चार दिवसापासून गावातच हजर नसून त्याबाबत पुलंगाव पोलीस स्टेशनला कोणीही हरवल्याची तक्रार दिली नाही. अशा फुसट महितीच्या आधारे डी. बी. पथकाने आपल्या कुशल कार्यक्षमतेने व योग्य खबरीच्या मदतीने सर्वात आधी धडवीरहित मुंडक्याची ओळख पटवली. डि.बी. पथकाला मुंडके कोणाचे हे माहिती मिळवतांना जणु तारेवरची कसरतच करावी लागली होती. अत्यंत कमी वेळात त्यांना मुडंक्याची ओळख पटविण्यात यश आले. आता समोरचा प्रश्न होता की असा क्रूर प्रकार केला तरी कोणी. डि.बी. पथकाने आपली गोपनीय यंत्रणा आणखी प्रबळ केली. तेव्हा माहिती मिळाली की, अनिल बेंदले याच्या घरातून काही दिवसांपुर्वी नेहमी भांडणाचा आवाज राहत होता. परंतू मागील तिन चार दिवसांपासुन काहिही आवाज ऐकु येत नाही. व कोणी अनिलबद्दल विचारले तर त्याची पत्नी सांगते की, अनिल हा कामाला बाहेरगावी गेला. तेव्हा पथकाने अहोरात्र एक करून माहिती मिळविली की,दि. 06/08/2022 रोजी दुपारदरम्यान अनील बेंदले याची पत्नी मनीषा व तिचा मुलगा असे मिळुन एका आँटोत काही बँग व एका प्लास्टीक बोरीत भरून काहितरी नेतांना दिसले. आता शोध सुरू झाला तो आटो कुणाचा?डीबी पथकाने विलंब न लावता अँटोचा शोध घेतला. व चालकाकडुन हवी ती माहिती मिळवली. संपुर्ण माहितीची जुळवाजुळव करून मृतक अनिल बेंदले याची पत्नी हिला ताब्यात घेतले. तिला विचारले असता तो कामाला गेला असे उडवाउडवीचे उत्तरे दिली यावरून संशय बळकटल्याने पोलिसी हिसका दाखविताच तिने गुन्ह्याची कबुली दिली. अनिल बेंदले याची पत्नी अत्यंत धाडसी वृत्तीची व कराटे चँम्पीयन असुन टि.व्ही. मालीका क्राईम पेट्रोल, दस्तक प्रमाणे मुलाच्या मदतिने प्रकरणाला अंजाम दिल्याची चर्चेला ऊधान आला आहे. सिनेस्टाईल गुन्ह्याचा ऊलगडा केल्याने पुलगांवकरांनी ठाणेदार शैलेश शेळके व जमादार हाडके यांच्या डि.बी. पथकाचे अभिनंदन केले.
पुढील अधीक तपास पुलगांव पोलीस करीत आहे.हे प्रकरण गँभीर स्वरूपाचे असल्याने घटनास्थळी पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत सोळंखे, उपविभागीय पोलीस अधिकारी गोकुळसिंग पाटील यांनी भेट देऊन मार्गदर्शन केले असून पुढिल तपास पोलीस निरीक्षक शैलेश शेळके, महादेव सानप, राजेंद्र हाडके, खुशालपंत राठोड, संजय पटले, पंकज टाकोने, शरद सानप, विनोद रघाटाटे, मुकेश वांदिले, जयदीप जाधव, ओम तल्हारी, प्रदीप सहाकाटे, फिरोज पठाण व पुलंगाव पोलीस स्टेशन चे कर्मचारी करीत आहे