जिल्हा सरचिटणीस जितेंद्र मोघे यांच्या नेतृत्वात घाटंजी तहसीलदार यांच्याकडे मागणी,
(अयनुद्दीन सोलंकी)
घाटंजी, 12 ऑगस्ट – यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमेटीचे सरचिटणीस तथा युवा नेते जितेंद्र ऊर्फ बाळासाहेब शिवाजीराव मोघे यांच्या नेतृत्वात घाटंजीच्या तहसीलदार पूजा माटोडे यांना निवेदन देऊन सततच्या पावसामुळे घाटंजी तालुक्यातील पिकाचे अतोनात नुकसान झाले असल्यामुळे, शेतकऱ्यांना शासनाने जाहीर केलेली रक्कम हेक्टरी 13,600/तोकडी असल्यामुळे, घाटंजी तालुक्यातील शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी 50,000/- पन्नास हजार रुपये जाहीर करण्यात यावी. तसेच घाटंजी तालुक्यातील एकही मंडळ या लाभापासून वगळण्यात येऊ नये. या करिता तहसीलदार घाटंजी यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष माणिक मेश्राम, घाटंजी नगर परिषदेचे माजी अध्यक्ष किशोर दावडा, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आशिष लोणकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अभिषेक ठाकरे, घाटंजी तालुका काँग्रेस कमेटीचे माजी अध्यक्ष डॉ. विजय कडू, काॅग्रेसचे ज्येष्ठ नेते वासुदेव महल्ले, घाटंजी नगर परिषदेचे माजी अध्यक्ष सुभाष गोडे, संजय गोडे, काॅग्रेसचे ज्येष्ठ नेते अनंतराव चौधरी, अरविंद चौधरी, पारवा विभागाचे गणेश मुद्दलवार, माजी सरपंच यादवराव निकम, राजापेठचे सरपंच रमेश आंबेपवार, सुनील हूड, झटाळा येथील माजी उपसरपंच कमरखां पठाण, अजाबराव लेनगुरे, जितेंद्र जुनगरे, गणेश उन्नरकर, जिल्हा युवक काॅग्रेसचे आकाश आत्राम, भांबोरा येथील स्वानंद चव्हाण, सागर डंभारे, घाटंजी नगर परिषदेचे माजी सभापती संदीप बिबेकार, राजू निकोडे, संतोष किनकर, मोहन भोयर, वैजयंतीताई ठाकरे, शकुंतला होळकर, रघुनाथ शेंडे, अक्षय पवार, वासुदेव राजूरकर, दशरथ मोहुर्ले, युवा नेते निखिल देठे, अरविंद जाधव, महेश ठाकरे, मनोहर चौधरी, दिलीप राठोड, जुबेर खान, अब्रार पटेल, रवी गेडाम, प्रणय ठाकरे व ईतर काँग्रेसचे पदाधिकारी तथा कार्यकर्ते उपस्थित होते.