Home यवतमाळ अकोला येथील नंद व इतरांनी संगणमत करुन खोटे व बनावट दस्तऐवज तयार...

अकोला येथील नंद व इतरांनी संगणमत करुन खोटे व बनावट दस्तऐवज तयार करुन शासनाची लाखों रुपयाची फसवणुक केल्या प्रकरणी फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी..!

199

मुकुटबन पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल..!

(विनोद पत्रे)
यवतमाळ, 12 ऑगस्ट – अकोला येथील गैरअर्जदार नंद, मिश्रा, जिल्हा खनिकर्म अधिकारी गोसावी, गोपाणी या सह आठ जनांनी आपसी संगणमत करुन खोटे व बनावट दस्तऐवज तयार करुन शासनाची दिशाभूल करुन लाखों रुपयाची फसवणुक केल्या प्रकरणी भादंवि 420, 468, 470, 471 व ईतर कलमातंर्गत फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे, अशी मागणी घाटंजी तालुकास्तरीय रोजगार हमी योजनेचे माजी अध्यक्ष अयनुद्दीन सोलंकी यांनी मुकुटबन पोलीस ठाण्यात लेखी तक्रारीतून केली आहे.
झरी जामणी तालुक्यातील मुकुटबन पोलीस स्टेशनच्या हद्दीत मौजै – अडेगांव येथै महाराष्ट्र शासनाची वर्ग 2 असलेली शेतजमीन जी वन विभागाच्या मालकीची आहे. सदर शेतजमीन ही गायरान करिता राखीव ठेवण्यात आली होती. ज्याचा शेत सर्वे नंबर 795 क्षेत्रफळ 137 हेक्टर 60 आर आहे. त्या पैकी 24 हेक्टर 87 आर शेतजमीन गैरअर्जदार नंद यांच्या नावाने जिल्हा खनिकर्म अधिकारी गोसावी, गजभिये व इंगळे यांनी संगणमत करुन शासनाची दिशाभूल व फसवणुक करुन नंद व मिश्रा यांच्या नावाने बेकायदेशीर रित्या 13 एप्रिल 2017 रोजी भाडे तत्वावर (LEASE) लिहून दिलेले आहे. या बाबत सदर प्रकरणात आक्षेप प्राप्त झाल्याने कायदेशीर त्रुटी दुर करण्याकरिता 6 सप्टेंबर 2018 रोजी चुकीचा दुरुस्ती लेख लिहुन दिला आहे.
विशेषतः सदर दोन्हीही दस्तऐवज नंद व मिश्रा यांनी गैरअर्जदार क्रमांक 3 ते 5 यांच्या मदतीने सदर लिजवर घेतलेली शेतजमीन ही वन विभाग, सक्षम अधिकारी व शासनाची परवानगी न घेता स्वतःच्या नावाने लिजवर घेतलेली आहे व त्यानंतर गैरकायदेशिर रित्या वन विभागाची परवानगी न घेता गैरअर्जदार 6 यांनी म्हणजेच गोपाणी व मिश्रा यांच्या नावाने हस्तांतरण केलेले आहे. कारण सदर बाब सुद्धा गैरकायदेशिर रित्या आहे. कारण गैरअर्जदार 6 मधील मिश्रा हा नंदचा मुखत्यारपत्र धारक आहे. तसेच त्याने लिज धारक म्हणून स्वतःच्या नावाने हस्तांतरण पत्र केलेले आहे.
वास्तविक पाहता, या बाबत केंद्र शासनाने 11 जानेवारी 2017 नंतर लिज जमीनीबाबत कोणत्याही प्रकारचा करारनामा (AGRIMENT) करुन देण्याबाबत माईनिंग लिज Rules 8 (4) of MCR 2016 या द्वारे बंदी आणलेली आहे. असे असतांना सुद्धा गैरअर्जदार गोसावी, इंगळे व गजभिये आदींनी गैरकायदेशीर रित्या 13 एप्रिल 2017 रोजी लिज करारनामा लिहुन दिला आहे. त्या नंतर 6 सप्टेंबर 2018 मध्ये चुक दुरुस्ती लेख लिहुन ठेवण्यात आला आहे. त्या करिता गैरअर्जदार नंद व इतरांनी शासनाची दिशाभूल व फसवणुक करुन शासनाचे लाखो रुपयाचे नुकसान केलेले आहे.
त्यामुळे सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी विरुद्ध भादंवी 420, 468, 470, 471 व इतर कलमान्वये गुन्हे नोंदविण्यात यावे, अशी मागणी घाटंजी तालुका रोहयोचे माजी अध्यक्ष अयनुद्दीन सोलंकी यांनी मुकुटबन पोलीस ठाण्यात शुक्रवारी लेखी तक्रारीतुन केली आहे.