प्रतिनिधी – विनोद महाजन पुलंगाव /वर्धा
वर्धा / आर्वी तालुक्यातील विरुळ आकाजी येथे दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा हा कार्यक्रम बेलदार व ठाकूर समाजाच्या वतीने आयोजित केला होता त्यानिमित्ताने विरुळ गावात
दुपारी सगडे महिला व नागरिक एकत्रीत येऊन महिला
आपआपल्या घरून गौरी(भुजिलिया पूजन, बहुड्डे)घेऊन गावातील प्रत्येक मंदिरात बँड बाजाच्या गजरात गौरी (भुजिलिया पूजन)पुजनाची गावातून मिरवणूक काढुन मंदिरात जाऊन पूजाअर्चा करीत शेवटी गावातील तलावावर गौरी (भुजिलिया) विसर्जीत करण्यात आले दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा न चुकता या कार्यक्रमाचे मोठ्या भक्तिभावाने हा सण बेलदार व ठाकूर समाजा तर्फे साजरा करण्यात येतो
यावेळी बेलदार व ठाकूर समाजाचे मोठ्या प्रमाणात महिला ,पुरुष, युवा वर्ग व गावातील नागरिक उपस्थित होते.