वाशिम:-पो.स्टे कारंजा ग्रा जि. वाशिम येथे दि. १३/०८/२२ रोजी पो.स्टे प्रभारी अधिकारी स. पो.नि योगेश ईंगळे सोबत पो.स्टॉप सह खेर्डा परीसरात पेट्रोलींग करीत असतांना गोपनिय माहीती
मिळाली
की एका पांढ-या रंगाच्या अशोक लेलँड कंपनीच्या गाडीमध्ये जनावरे (बैल) निर्दतयतेने कोंबुन विक्री करीता नेत आहे अशा माहीती वरुन स.पो.नि योगेश ईंगळे सोबत पो.स्टॉप ना.पो.कॉ ११४१ गजानन लोखंडे सह खेर्डा चौकात थांबुन कामरगाव कडुन येणा-या पांढ-या रंगाची अशोक लेलँड कंपनीची गाडी क एमएच ३७ टी २२८६ या गाडीला थांबवुन गाडीची तपासनी केली असता त्या मध्ये एकुन ०७ बैल प्रत्येकी वय अंदाजे ०९ ते १३ वर्ष सर्व बैलांना आखुड दोराने निर्दयतेने बांधल्यामुळे बैलांना निट हालचाल करता येत नव्हती तसेच निट उभे राहता येत नव्हते व कोणत्याही प्रकारची चारापाण्याची व्यवस्था व सोय न करता गाडीमध्ये कोंबलेल्या अवस्थेत बांधुन असल्याचे दिसुन आल्याने गाडीमधील प्रत्येक बैलाची कींमत अंदाजे १५००० रु असा एकुन १०५०००/ रुपये व एक पांढ-या रंगाची अशोक लेलँड कंपनीची गाडी क एमएच ३७ टी २२८६ कींमत अंदाजे ६००००० रुपये असा एकुन ७०५०००रुपये चा मुददेमाल मिळुन आला आरोपी चालक नामे शेख ईमरान कुरेशी शेख सत्तार कुरेशी वय २८ वर्ष रा. उंबर्डा बाजार ता. कारंजा जि. वाशिम यास ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर सदर वाहनातील बैलांची मा. पशुवैदयकीय अधिकारी तालुका लघु पशुचिकीत्सालय कारंजा लाड जि. वाशिम याचे कडुन वैदयकीय तपासनी करुन सदर बैल मा. सचिव ग्रा. पं उंबर्डा बाजार यांना पत्र देवुन एकुन ०७ बैल हे कोंडवाडा उंबर्डा बाजार येथे दाखल
करण्यात आले आहे.
वरील मु पांढ-र 6-या रंगाची अशोक लेलँड कंपनीची गाडी क एमएच ३७ टी २२८६ चा चालक नामे चालक नामे शेख ईमरान कुरेशी शेख सत्तार कुरेशी वय २८ वर्ष रा. उंबर्डा बाजार ता.
कारंजा जि. वाशिम याने एकुन ०७ बैलांना आखुड दोरीने बांधुन निर्दयतेने कोंबुन अवैध रित्या विक्री करीता घेवुन जात असल्याचे मिळुन आल्याने सदर आरोपी विरुध्द कलम ११ (१)घ,च प्राण्यांना कुरतेने वागविण्यास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम १९६० सह कलम १३०/१७७ मो. वा.का प्रमाणे कार्यवाही करण्यात आली आहे. सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक श्री बच्चन सिंह सा., अपर पोलीस अधिक्षक श्री. गोरख भामरे सा, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. जगदीश पांडे सा. यांचे मार्गदर्शनात स.पो.नि योगेश इंगळे, पो.उप. नि चंदन वानखडे, ना.पो.कॉ ११४१ गजानन लोखंडे ना.पो.कॉ ३६६ सतिश जाधव यांनी केली.
प्रतिनीधी:-फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206