Home वाशिम पो. स्टे.वाशिम शहरची कारवाई;वाशिम जिल्हयात महिलांच्या सोनसाखळया चोरी करणा-या आरोपींना अटक

पो. स्टे.वाशिम शहरची कारवाई;वाशिम जिल्हयात महिलांच्या सोनसाखळया चोरी करणा-या आरोपींना अटक

286

 

सोनसाखळी चोरीचे ०४ व मोटारसायकल चोरीचा ०१ असे
एकूण ०५ गुन्हे उघड

(फुलचंद भगत/वाशिम)
वाशिम:-फिर्यादी नामे श्रीमती विजयालक्ष्मी दशरथ राजूलवार, वय ७० वर्षे, रा. त्रिवेणी नगर, हिंगोली नाका,वाशिम यांनी दि. ०५/०८/२०२२ रोजी पो.स्टे. वाशिम शहर येथे येउन फिर्याद दिली की, दि. ०५/०८/२०२२ रोजी सकाळी ११:०० त्या देवदर्शनाकरिता बालाजी मंदिर, वाशिम येथे गेल्या होत्या. दर्शन घेउन त्या राजणी चौक मार्गे हिंगोली नाक्याकडून पायी घरी येत असताना जुना पशू वैद्यकिय दवाखाना, शुक्रवार पेठ, वाशिम येथे त्यांच्या मागून ०२ इसम एक काळसर रंगाच्या मोटारसायकलवर बसून आले
त्यातील मागे बसलेल्या इसमाने त्यांच्या गळयातील मणी मंगळसूत्र असलेली लांब पोथ किंमत ४०,०००/-
रू. तोडून पळून गेले. त्यानंतर फिर्यादी हे पो.स्टे. ला आले असता त्यांनी दिलेल्या फिर्यादी वरून पो.स्टे. वाशिम शहर अप.क. ६२५/२०२२, कलम ३९२,३४ भा.दं.वि. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.
मा. पोलीस अधिक्षक श्री. बच्चन सिंह सो. यांच्या मार्गदर्शनाखाली वाशिम शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री. रफीक शेख यांनी सदर गुन्हयाच्या तपासाबाबत डि.बी. पथकास आदेश देउन रवाना केले असता डि.बी. पथकाने सिसीटिव्ही फूटेज व गोपनिय माहितीच्या आधारे आरोपी नामे चंदू बळीराम खिल्लारे ऊर्फ शेख इम्रान शेख ईस्माईल, वय ४० वर्ष, धंदा-मजुरी, रा. कांती नगर, वाशिम, ह.मु. श्रीमती अमिनाबाई शेख यांच्या घरी भाडयाने, महादेव वाडी, मंगळवार बाजार, हिंगोली यास हिंगोली येथून ताब्यात घेतले व
त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने गुन्हयाची कबुली दिली व त्याच्याकडे केलेल्या चौकशीत माहिती दिली की, सदरचा गुन्हा त्याचा पुतण्या नामे दिपक उर्फ गोलू सुनिल खिल्ल्लारे, वय २० वर्षे रा. भिमनगर,चामुंडा देवी जवळ, वाशिम येथे संघपाल भारत कांबळे याच्या घरी राहत असून दि. ०५/०८/२०२२ रोजी आरोपी चंदू खिल्लारे, संघपाल कांबळे व गोल्याने मिळून आज एक मोठा हात मारायचा अशी प्लॅनिंग केली व आरोपी चंदू खिल्लारे व गोल्या यांनी गोल्याने मसला शिवार, पांगरी नवघरे, ता. मालेगाव, जि. वाशिम येथून चोरून आणलेल्या काळया रंगाच्या मोटारसायकलवर मन्नासिंग चौकात आले व आरोपी चंदू खिल्लारे याने फिर्यादी श्रीमती राजूलवार यांच्या गळयातील सोन्याची पोथ हिसकावून तोडली व ती पोथ घेउन ते तेथून
पळून गेले. तसेच आरोपी चंदू खिल्लारे याने माहिती दिली की, त्याचा पुतण्या दिपक उर्फ गोलू सुनिल खिल्ल्लारे व पंचशिल नगर येथे राहणारा करण संतोष खडसे, रा. पंचशिल नगर, वाशिम यांनी मिळून मालेगाव, वाशिम व हिंगोली येथे अशाच प्रकारच्या महिलांच्या गळयातील पोथा तोडल्या आहेत. त्यानंतर आरोपी नामे करण संतोष खडसे, वय २१ वर्षे, रा. पंचशिल नगर, वाशिम याचा शोध घेउन त्यास ताब्यात घेतले व त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने व दिपक उर्फ गोलू सुनिल खिल्ल्लारे यांनी मिळून मालेगाव, वाशिम व हिंगोली येथे अशाच प्रकारे चो-या केल्याचे सांगितले आहे. नमूद आरोपींना अटक करून रिमांडकामी मा. न्यायालयात हजर केले असता मा. न्यायालयाने त्यांना दि. १६/०८/२०२२ रोजी पर्यंत
पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले असून त्यांच्याकडे चौकशी करून गुन्हयातील चोरीस गेलेली मालमत्ता
हस्तगत करीत आहोत. तसेच डि.बी. पथक ईतर आरोपींचा शोध घेत आहे.

*वर नमूद आरोपींकडून खालील प्रमाणे एकूण ०५ गुन्हे उघडकीस आले आहेत*

१) पो.स्टे. वाशिम शहर अप.क. ६२५/२०२२, कलम ३९२,३४ भा.दं.वि.

२) पो.स्टे. वाशिम शहर अप.क. ६३३ / २०२२, कलम ३९२,३४ भा.दं.वि.

३) पो.स्टे. वाशिम ग्रामीण अप.क. ३०९/२०२२, कलम ३९२,३४ भा.दं.वि.

४) पो.स्टे. मालेगाव अप.क. २७४/२०२२, कलम ३९२,३४ भा.दं.वि.

५) पो.स्टे. जऊळका अप.क. १९८/२०२२, कलम ३७९ भा.दं.वि.

सदरची कामगिरी मा. पोलीस अधिक्षक श्री. बच्चन सिंह सो., अपर पोलीस अधिक्षक श्री. गोरख भामरे सो., उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सुनिलकुमार पुजारी साो. यांच्या मार्गदर्शनाखाली व ठाणेदार श्री. रफीक शेख यांच्या नेतृत्वाखाली डि.बी. पथकाचे सपोनि खंदारे, पो.ह.क. ३४७/ लालमणी श्रीवास्तव, पो.ना.क्र. ८५६ / रामकृष्ण नागरे, पो.ना.क. २१० / मात्रे, पो.शि.क. २४३/ विठ्ठल महाले व पो.शि.क. ३०३/२ संदिप वाकुडकर यांनी पार पाडली आहे.