शेख वसीम शेख हमिद
बुलढाणा , दि. ३० :- पोलीस मुख्यालय या ठिकाणी दि 29 जाने ते 4 फेब्रुवारी या सात दिवस चालणाऱ्या वाहतूक सुरक्षा व नागरी संरक्षण प्रशिक्षण वर्गाचा उद्घाटन सोहळा आज थाटात संपन्न झाला. रस्ता सुरक्षा प्रशिक्षण पोलीस व शिक्षण विभागाच्या संयुक्त विद्यमाने कार्यान्वित करण्यात येत आहे. उद्घाटन प्रसंगी जिल्हा पोलीस अधीक्षक मा डॉ दिलीप पाटील भुजबळ यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात रस्त्यावर वाढत चाललेल्या अपघाता विषयी चिंता व्यक्त केली. यावर उपाय म्हणून आर एस पी प्रशिक्षनाची गरज व महत्त्व सांगतांना याद्वारे अपघात नियंत्रण साठी प्रशिक्षणार्थींनी लोकांमध्ये जनजागृती करण्याची गरज त्यांनी बोलून दाखवली. एक अपघात संपूर्ण कुटुंब उध्वस्त करू शकतो असे ते म्हणाले. आर एस पी चे महाराष्ट्राचे महानीदेशक मा श्री अरविंद देशमुख यांच्या अथक परिश्रमातून ही चळवळ सुरू झाली आहे असेही ते म्हणाले. कार्यक्रमाला विशेष प्रमुख पाहुणे मा श्री षण्मुखराजन एस मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बुलढाणा हे ही उपस्थित होते त्यांनी आपल्या मार्गदर्शनात रस्ता सुरक्षा व त्या संबंधित काम म्हणजे ईश्वरी सेवा असे बोध काढले. महाराष्ट्राचे महानीदेशक मा श्री अरविंद देशमुख यांनी आपल्या प्रास्ताविकात आर एस पी प्रशिक्षण बद्दल विस्तृत माहिती सांगुन त्याचे महत्त्व समजून सांगितले. माध्यमिक शिक्षण अधिकारी श्रीराम पानझाडे यांचे मार्गदर्शन व सहकार्य या संपूर्ण प्रशिक्षना साठी लाभले त्यांनी आपल्या मार्गदर्शनात या योजनेत शिक्षण विभागाचे संपूर्ण सहकार्य लाभल अशी ग्वाही दिली. उद्घाटन प्रसंगी जिल्हा वाहतूक निरीक्षण बी आर गीते यांनी अथक परिश्रम घेतले . प्रशिक्षनासाठी 35 शाळांचे शिक्षक प्रतिनिधी उपस्थिती होते. जे भविष्यात आर एस पी अधिकारी म्हणून कार्य करणार आहेत. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन काळे सर तर आभार प्रदर्शन आशिष देशपांडे यांनी केले. तर गोंदिया जिल्हाचे आर एस पी अधिकारी अनिल सहानी व ठाकूर यांची विशेष उपस्थित होती.