Home बुलडाणा बुलढाणा जिल्ह्यातील दुचाकींच्या नंबरचा अकोल्यात गैरवापर?

बुलढाणा जिल्ह्यातील दुचाकींच्या नंबरचा अकोल्यात गैरवापर?

693

 

वाहतूक पोलीसांचा हलगर्जीपणा?
बोगस दुचाकी वाहन धारकाला कागदपत्रे न तपासता दिले सोडून

प्रतिनिधी:-( रवि आण्णा जाधव )

देऊळगाव राजा :-स्थानिक अकोला शहरात दि.२६मार्च २०२१रोजी अकोला वाहतूक शाखेचे पोलिस अधिकारी सुपेश इंगळे यांनी इ-चलान नुसार एम.एच.२८ए.एम.२१५१ या नंबरची होंडा कंपनीची सीबी शाईन दुचाकी या दुचाकीस्वाराला अडवणुक करत सदर दुचाकीस्वाराला वाहन चालवण्याचा परवाना नसल्यामुळे २००दंड आकारण्यात आला.परंतु सदर वाहतूक पोलीस कर्मचारी सुपेश इंगळे यांच्या हलगर्जीपणामुळे सदर दुचाकीवर बोगस नंबर प्लेट असतांना गाडीची कागदपत्रे न तपासता केवळ चालकाला परवाना नसल्याचा दंड बजावून सदर प्रकरणात धक्कादायक प्रकार दि.९आॕगस्ट रोजी मुळ मालकाला जिल्हा विधी सेवा प्राधिकरण बुलढाणा येथे लोक अदालतीमध्ये वाहतूक इ चलन निश्चित करण्यासाठी दि.१३आॕगस्ट २०२२रोजी दाखल पुर्व प्रकरणासाठी वाहतूकीच्या नियमांचे उल्लंघन करुन मोटार वाहन अधिनियमाच्या तरतुदीनुसार शिक्षा पाञ व तडजोड पाञ अपराध केल्यामुळे त्या बाबतचे विवरण फोटो सह नोटीस मुळ मालकाला प्राप्त होताच मुळ मालकाने सदर प्रकरणाची शहानिशा केली असता सदर धक्कादायक प्रकार हा अकोला शहरात घडल्याचे लक्षात येऊन सदर प्रकारात दुसऱ्या व्यक्तीने आपल्या लाल रंगाच्या होंडा दुचाकीवर पाडळी शिंदे येथील विशाल वसंतराव शिंदे यांच्या दुचाकीचा नंबर सदर वाहतूक पोलीस अधिकारी सुपेश इंगळे यांनी पाडलेल्या इ चलानवर असून चालकाचे नाव श्रीकांत वडतकर हे नोंदवुन चालकाकडे गाडी चालवण्याचा परवाना नसल्यामुळे २००रुपयांचा दंड आकारला होता.परंतु त्यांनी गाडीची कागदपत्रे न तपासता केवळ वाहन चालवण्याचा परवाना नसल्यामुळे दंड आकारला जर वाहतूक पोलीस कर्मचारी सुपेश इंगळे यांनी गाडीची मुळ कागदपत्रे तपासली असती तर मुळ गाडी मालकाला शारिरीक आर्थिक व मानसिक ञास सहन करावा लागला नसता.सदर प्रकाराबाबत मुळ गाडी मालक विशाल वसंतराव शिंदे यांनी दुचाकी नंबरचा गैरवापर व सदर बोगस दुचाकीस्वाराची वेळीच चौकशी केली असती तर सदर प्रकरणात वेळ काढू पणा करणारे व पाठीशी घालणारे वाहतूक पोलीस कर्मचारी यांच्या विरोधात अकोला आणि बुलढाणा यांच्याकडे दाद मागणार असल्याची प्रतिक्रिया प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना दिली, असून यात वरिष्ठ अधिकारी काय कार्यवाही करतात याकडे लक्ष लागले आहे.