Home वाशिम ताम्हीणी घाटात ४०० मीटर दरीत कार कोसळून ३ जण ठार

ताम्हीणी घाटात ४०० मीटर दरीत कार कोसळून ३ जण ठार

528

 

वाशिम:-रायगड – पुणे माणगाव दरम्यानच्या ताम्हीणी घाटात आज शनिवार दि. २० ऑगस्ट रोजी संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास पुण्याहून माणगावकडे येणारी कार घाटातील कोंडेथर येथील वळणावरुन थेट ४०० मीटर खोल दरीत कोसळून खालच्या रस्त्यावर आदळून भीषण अपघात झाला. अपघातग्रस्त कारमध्ये एकूण सहा जण होते, त्यातील तिघे जागीच ठार झाले आहेत. तर तिघा जखमींना वाचवण्यात रेस्कू टिम व पोलिसांना यश आले असल्याची माहिती रायगड जिल्हा पोलीस अधिक्षक अशोक दुधे यांनी दिली.


हे सर्व प्रवासी वाशीम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील असून ते शनिवारी पुण्याहून ताम्हीणी घाट मार्गे कोकणात मामगावकडे येत असताना कोंडेथर येथील एक अवघड वळणावर चालकाचा गाडीवरील ताबा सूटून कार थेट कड्यावरुन ४०० मीटर खाली असलेल्या घाटातील रस्त्याच्या बाजुच्या नाल्यातच कोसळली. याची माहिती अपघातानंतर तत्काळ बचाव कार्यासाठी घटनास्थळी पोहोचलेल्या साळूंखे रेस्क्यू टिमचे प्रमुख प्रशांत साळूंखे यांनी दिली. दरम्यान महाड येथील सिस्केप रेस्क्यू टिम, स्थानिक ग्रामस्थ आणि रायगड पोलीस सद्यस्थितीत संयुक्तरित्या बचाव कार्य करित असल्याचे साळुंखे यांनी सांगितले. अपघातग्रस्त कारमध्ये एक प्रवासी अद्याप अडकलेला असून त्याला काढण्याचे काम सुरु आहे.या अपघातात ऋषभ चव्हाण, सौरभ भिंगे,क्रष्णा राठोड यांचा जागीच म्रुत्यु झाला.तर रोहन गाडे,प्रवीण सरकटे, रोहन चव्हाण हे ३ जण जखमी झाले. जखमींवर माणगाव उपजिल्हा रुग्णालयात औषधोपचार करण्यात आले. या अपघाताची नोंद माणगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

प्रतिनीधी:-फुलचंद भगत
मंगरूळपीर/वाशिम
मो.8459273206