सर्पमिञाने मोठ्या शिताफिने अजगराला पकडुन निसर्ग अधिवासात सोडले
वाशिम:-मंगरुळपीर तालुक्यातील मसोला बु.येथील विनोद खाडे या शेतकर्यांच्या पेडगाव शिवारात असलेल्या शेतात आढळलेल्या अंदाजे दहाफुट असणार्या मोठ्या अजगराला तर्हाळा येथील अक्षय सुनिल खंडारे या सर्पमिञाने मोठ्या शिताफिने पकडुन सदर अजगराला निसर्ग अधिवासात सोडुन जिवनदान दिले तर हा अजगर पकडल्याने परिसरातील शेतकर्यांनीही सूटकेचा निस्वास सोडला आहे.
साप म्हटले की भल्याभल्यांची गाळण ऊडते आणी त्यातही अजगर म्हटले की विचारुच नका इतकी प्रचंड भिती लोकांच्या मनात भरलेली आहे.मंगरुळपीर तालुक्यातील मसोला बु.येथील विनोद खाडे या शेतकर्याच्या तर्हाळा शिवारात असलेल्या शेतामध्ये तसेच त्या अजगराचे आजुबाजुच्या परिसरात भलामोठा अजगर वास्तव्यास असल्याचे याआधी अनेकांना दिसले.दि.२१ आगष्ट रोजी दुपारच्या सुमारास एका गुराख्याला सदर शेतात आकाराने मोठा आणी दहा ते बारा फुट लांबीचा अजगर असल्याचे दिसताच त्याने सदर माहीती गावातील लोकांना सांगीतली.अजगर असल्याची वार्ता वार्यासारखी पसरताच गावकर्यांनी बघण्यासाठी गर्दी केली.या घटनेची माहीती तर्हाळा येथील सर्पमिञ अक्षय खंडारे यांना दिली असता त्यांनी तात्काळ त्या शेतात येवुन मोठ्या शिताफीने त्या अजगराला पकडून निसर्ग अधिवासात सोडले असल्याचे पो.पा.सुमेध खाडे यांनी सांगीतले.सदर अजगराने काहीतरी खाल्ले असल्याने तो सुस्त होता त्या अजगराराला पकडू शकले असे कळले.त्या अजगराला पाहण्यासाठी गावकर्यांनि गर्दी केली होती.
प्रतिनीधी:-फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206