Home यवतमाळ डॉ. निरज वाघमारे यांच्या तर्फे तान्हा पोळा बैल सजावट स्पर्धेचे आयोजन.

डॉ. निरज वाघमारे यांच्या तर्फे तान्हा पोळा बैल सजावट स्पर्धेचे आयोजन.

574

( विशेष सजावटीस रोख बक्षीस तर सहभागी स्पर्धकांना प्रोत्सांपर बक्षिसांची मेजवानी )

यवतमाळ / प्रतिनिधी :
शेतकऱ्यांचा खरा मित्र म्हणून बैलांकडे बघितले जाते. ऊन आणि पावसात शेतीत राबणाऱ्या बैलांच्या प्रति सन्मान आणि कृतज्ञता व्यक्त करणारा सण म्हणजे पोळा. संपूर्ण राज्यात पोळ्याचा सण उत्साहात साजरा केला जातो. मात्र, विदर्भात तान्हा पोळा सणाची विशेष धूम असते. तान्हा पोळा साजरा करण्याची ऐतिहासिक परंपरा खऱ्या अर्थाने नागपूरपासून सुरु झाली असली तरी, आता पूर्व विदर्भातील प्रत्येक जिल्ह्यात तान्हा पोळा मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. याच पार्श्वभूमी शहरातील युवा सामाजिक कार्यकर्ते डॉ. निरज वाघमारे यांनी उद्या दिनांक २७ ऑगस्ट रोजी भव्य तान्हा पोळा बैल सजावट स्पर्धेचे आयोजन केले आहे.
या आधुनिक युगात व ऑनलाईनच्या काळात आपली रूढी प्रथांची चिमुकल्यांना माहिती राहावी त्याकरीता असे आयोजन करण्यात आल्याची महिती डॉ. निरज वाघमारे यांनी दिली. या स्पर्धेची सुरुवात दिनांक २७ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी ०९.०० वाजता होईल तर बक्षिसाचे वितरण लगेच दहा वाजता होईल, दारव्हा रोड वरील नेताजी नगर भागात असलेल्या डॉ. निरज वाघमारे यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या आवारात या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावनाऱ्या बाळगोपलास ३३३३/- द्वितीय क्रमांक २२२२/- तर तृतीय पारितोषिकासाठी ११११/- चे रोख पारितोषिक व प्रत्येक सहभागी स्पर्धकाला १११ /- रुपयांचे प्रोत्साहन पर बक्षिस आयोजकांकडून देण्यात येणारं आहे.

• बाळगोपाळांची लगबग •
विदर्भात खास बालगोपालांसाठी पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी तान्हा पोळा साजरा केला जातो. या दिवशी सर्व लहान मुले व मुली लाकडाच्या बैलाला सजवून त्याची मिरवणूक काढतात. हा बैल सजवण्यासाठी कितीतरी दिवस आधीपासूनच त्यांची लगबग सुरू झालेली असते. बैलाला रंगवणे, तोरण, फुलांनी सजवणे, त्याला आकर्षक बनवणे अशी लगबग बालगोपाळांची असते. यवतमाळ शहरातही उदयाला तान्हा पोळा बैल सजावट स्पर्धेचे आयोजन केल्याने या स्पर्धेत सहभागी होण्याच्या दृष्टीने या भागातील बाळगोपलांची लगबग पहावयास मिळत आहे….