Home मराठवाडा महावितरणच्या भोंगळ कारभाराविरूद्ध ग्रामस्थ आक्रमक,विकास मंचचा कुलूप ठोकण्याचा इशारा

महावितरणच्या भोंगळ कारभाराविरूद्ध ग्रामस्थ आक्रमक,विकास मंचचा कुलूप ठोकण्याचा इशारा

171

 

घनसावंगी-लक्ष्मण बिलोरे

जालना जिल्ह्यच्या घनसावंगी कुंभार पिंपळगाव येथील जळालेले तीन रोहित्र तसेच रोहित्रांसाठी केबल व किटकॅट तत्काळ बसवणे नसता महावितरण कंपनी कार्यालयास कुलूप लावण्याचा ग्राम विकास युवा मंचच्या वतीने देण्यात आला.
या विषयी अधिक वृत्त असे की कुंभार पिंपळगाव येथील बकरी बाजारपेठ, सरस्वती भुवन महाविद्यालय समोरील लोकवस्ती तसेच ग्रामपंचायत परिसरातील रोहित्र गेल्या तीन महिन्यापासून जळालेले आहे.या मुळे पिठाच्या गिरण्या बंद असुन पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली आहे.त्यातच गौरी गणपती चे आगमन होणार असून गावातील अनेक गणेश मंडळे, महिला वर्ग सजावट देखावे करण्यासाठी तयारीला लागले आहेत.परंतु सध्या गाव अंधारमय झाल्यामुळे चोरट्यांचा सुळसुळाट वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.यामुळे गौरी गणेश उत्सवावर विजेचे विघ्न निर्माण झाले आहे.तरी या संदर्भात संबंधित विभागांना याची वेळोवेळी माहिती देवून जळालेले रोहित्र तत्काळ बसवण्यासाठी विनंती देखील केलेली आहे.याची अद्याप पर्यंत साधी दखल सुद्धा महावितरण कंपनीने घेतलेली नाही.याचे मुख्य कारण म्हणजे गावातील विज बिल वसुली नाही हाच होय.परंतु यात नागरिकांचा दोष काय..? आपण कधी गावात येऊन नागरिकांना सेवा दिली का..?कोटेशन भरणा केल्या नंतर तत्काळ मिटर दिली जातात का..? विज बिल योग्य वेळेत दिली जातात का..?जर दिली असेल तर ती रितसर रिडिंग प्रमाणे आहे की अंदाजे..?अव्वा ते सव्वा नाहक विज बिल कशासाठी..?जे ग्राहक नियमित विज बिल भरणा करतात त्यांना आपण कशाप्रकारे सोयी सुविधा देतात..? अशा प्रकारे येथील नागरिकांना असे एक ना अनेक प्रश्न भेडसावत आहेत.केवळ गावाची वसुली नाही या कारणाने जळालेले रोहित्र तत्काळ न बसवणे हे निषेधार्थ आहे.अशा प्रकारचे निवेदन कुंभार पिंपळगाव येथील महावितरण कंपनी कार्यालयाचे सहायक अभियंता पी.आर.कांबळे यांना ग्राम विकास युवा मंच च्या वतीने देण्यात आले.तरी येत्या दि.३१/०८/२०२२ वार बुधवार पर्यंत जळालेले तीन रोहित्र तसेच रोहित्रांसाठी केबल व किटकॅट तत्काळ बसवून द्यावेत व गावातील विजेचे विघ्न दुर करावेत नसता यांची दखल न घेतल्यास दि.०१/०९/२०२२ वार गुरुवार रोजी महावितरण कंपनी कार्यालयास कुलूप लावून निषेध करण्याचा इशारा ग्राम विकास युवा मंच च्या वतीने देण्यात आला.यावेळी अक्षय चांडक, सुरेश कंटुले, महावीर व्यवहारे,प्रकाश बिलोरे, महारुद्र गबाळे, दिनेश दाड, संजय गोफने, वैभव कुलकर्णी, भागवत राऊत यांच्या सह अनेकांची उपस्थिती होती.