निर्मल विद्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा…!
नांदेड , दि. ३१ :- ( राजेश भांगे ) – मेंढला तालुका अर्धापूर येथील निर्मल विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, निर्मल स्कूल इंग्लिश मीडियम संयुक्तरित्या प्रजासत्ताक दिनानिमित्त, संस्थेच्या सचिव प्रा.आशा पालमकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
या कार्यक्रमास डॉ.राजेश्वर पालमकर,संजना पालमकर, प्राचार्य के.सविता, कु.तेजस्वी उपस्थित होते.
ध्वजारोहणानंतर लगेच संस्थेच्या सांस्कृतिक सभागृहात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रा. आशा पालमकर म्हणाल्या स्वातंत्र्य,स्वैराचार, हक्क यामध्ये असणारा सूक्ष्म फरक नीट समजावून घेतला व स्वतः मध्ये सकारात्मक बदल केला तरच आपला देश प्रगती पथावर जाईल. आपण गुन्हेगारासारखे वर्तन केले तर गुन्हेगाराचा देश म्हणून ओळखला जाईल. यामुळे सद्यस्थितीत पालकांची व विद्यार्थ्यांची जबाबदारी खूप मोठी व महत्त्वाची आहे.विज्ञान, तंत्रज्ञान व शिक्षण यावर खूप खर्च करावा लागेल. जुन्या लोकांचे अनुभव व नवीन लोकांची क्षमता पालकांनी आपल्या पाल्यात रुजवावी असे आवाहन त्यांनी केले.
अध्यक्षीय भाषणात डॉ. राजेश्वर पालमकर कर म्हणाले, काळानुरूप शिक्षणपद्धतीत बदल व्हावेत, राष्ट्रीय एकात्मतेच्या चळवळीत युवकांचा सहभाग असावा, शालेय विद्यार्थ्यांच्या अंगी नम्रता, आज्ञाधारक शिस्त असावी.
‘स्वच्छ विद्यालय स्वच्छ महाराष्ट्र’ “झाडे लावा झाडे जगवा”
“लेक वाचवा लेक जगवा” पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी अन्नसाखळीचे महत्त्व, अशा विविध विषयावर पालमकर यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात
प्राचार्य के. सविता, संजना पालमकर, तेजस्वी यांची भाषणे झाली. तसेच शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी-विद्यार्थिनी गावातील प्रतिष्ठित नागरिक कार्यक्रमास उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचाल कल्याण मोपाल यांनी तर आभार प्रशांत गौड यांनी केले.