Home यवतमाळ डॉ.निरज वाघमारे यांच्यातर्फे घरगुती गणपती सजावट स्पर्धेचे आयोजन.

डॉ.निरज वाघमारे यांच्यातर्फे घरगुती गणपती सजावट स्पर्धेचे आयोजन.

245

 

यवतमाळ / हरीश कामारकर
बाप्पाच्या आगमनाची घरोघरी तयारी होत असताना डॉ. निरज वाघमारे मित्रपरिवार यांच्यातर्फे घराघरांतील श्रीगणेश गणपती आरास स्पर्धा आयोजित केली आहे. गणेशोत्सवादरम्यान ३१ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर २०२२ या काळात घरोघरी प्राणप्रतिष्ठा केलेल्या बाप्पाच्या मूर्तीची सजावटीसाठी स्पर्धा होईल.
गणपती महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि गणेशोत्सव म्हणजे मराठी माणसाच्या मनाचा हळवा कोपरा. अतिशय श्रद्धा आणि मोठ्या भक्‍तिभावाने हा सण महाराष्ट्रात साजरा केला जातो. बाप्पांच्या आगमनापूर्वीच घरात लगबग सुरू झालेली असते. प्रत्येक जण आपापल्या परीने गणरायाच्या स्वागतासाठी सज्ज झालेला असतो. घरगुती गणपतींना होणारी सजावट लक्षात घेता डॉ. निरज वाघमारे मित्र परिवारातर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही घरगुती गणेशोत्सव सजावट स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेतील प्रथम विजेत्यास ११,१११/- पारितोषिक तर द्वितीय विजेत्यास ७७७७/- व तृतीय ५५५५/- ११११/- रुपयांचे पाच प्रोत्साहन पर बक्षीस ठेवण्यात आलेली आहे. या स्पर्धेतील सहभाग निशुल्क आहे. या स्पर्धेत सहभागी होण्याकरिता स्पर्धकांनी आपले नावे आयोजकांकडे दिनांक 3 सप्टेंबर पर्यंत नोंदवावे. ४ सप्टेंबर रोजी डॉ. निरज वाघमारे मित्रपरिवार व परीक्षकांकडून सजावटीचे परीक्षण करण्यात येईल. सुबक व मनमोहक सजावटीस क्रमांक देण्यात येतील यावरून प्रथम, द्वितीय व तृतीय पारितोषिके ठरविण्यात येतील तर इतर सर्व सहभागी स्पर्धांना आकर्षक भेटवस्तू देण्यात येतील अशी माहिती आयोजक डॉ. निरज वाघमारे यांनी दिली…