Home उत्तर महाराष्ट्र पत्रकार राजेंद्र भांड यांनी वृत्तपत्र शीर्षकांचा वापर करीत बहुभाषिक श्री गणेशाची पर्यावरणपूरक...

पत्रकार राजेंद्र भांड यांनी वृत्तपत्र शीर्षकांचा वापर करीत बहुभाषिक श्री गणेशाची पर्यावरणपूरक प्रतिमा साकारली…!

328

राजेंद्र भांड – नाशिक
लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाच्या सार्वजनिकतेत सांस्कृतिक वैभवाचा ठेवा दिला आहे. त्यानिमित्ताने या उत्सवात सर्व जाती धर्माच्या लोकांनी एकत्र यावे व हा लोकोत्सव व्हावा हा या मागचा प्रमुख हेतू १४विद्या व ६४ कलांच्या अधिपती असलेल्या गणरायाची आपण अनंत रूपे बघितले आहेत. गेल्या ४० वर्षापासून वृत्तपत्र क्षेत्रात पत्रकारिता वितरण यासह विविध विविध घटकांशी संबंध असल्यामुळे मनात विचार आला की वृत्तपत्रांच्या शीर्षकापासून गणरायाची प्रतिमा साकारावी आणि कलेचा अधिपती असलेल्या गणरायाने प्रतिमा माझ्याकडून साकारून घेतली ही गणेशाची प्रतिमा भारतभरातील तमाम वृत्तपत्र वाचक पत्रकार व वृत्तपत्र वितरक सर्वच प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधित्व करत आहे. प्रत्येक वृत्तपत्राची भाषा जरी वेगळी असली तरी सर्वांचे ध्येय एकच आहे ते म्हणजे समाज जागृती सोशल मीडियाचा कितीही अतिरेक झाला तरी मुद्रित माध्यमांवर वाचकांचा विश्वास आहे. बहुभाषिक गणराय जनतेने मोठ्या प्रमाणात वृत्तपत्रांचे वाचन करावे व पर्यावरणाचे संवर्धन करावे असा संदेश देत आहे. पाच फुटाची वृत्तपत्र शिर्षक गणेशाची प्रतिमा भांड न्यूज पेपर एजन्सी, डीजीपी नगर क्रमांक २ अंबड नाशिक 10 येथे स्थापन करण्यात आली आहे.