४.४३ लाख रु.ची बनावटी विदेशी दारू जप्त
वाशिम:-मा. पोलीस अधिक्षक श्री बच्चन सिंह सा यांनी समाजात व्यासनांच्या विख्याळयात अडकवुन अनेक कुटुंब दारूच्या व्यासनापाई अनेक जन गुन्हेगारीचा मार्ग अवलंबवितान समाजामध्ये शांतात व सुव्यावस्था नांदावी व कायद्याच राज्य अवाधीन राखावे यासाठी वाशिम जिल्हा पोलीस दल सदैव दक्ष असुन कायद्याचे पालन न करणा-या विरोधात सतत कडक कार्यवाहीचा सपाटा सुरू असुन याच पार्श्वभुमीवर पोलीस स्टेशन वाशिम ग्रामीण हद्दीत खालील प्रमाणे बनावट विदेशी दारू तयार करून विकणा-या बार वर धाड टाकुन लोकांचे जिवीताशी खेळणा-या बार मालकास बेड्या ठोकल्या आहेत
दिनांक ०२/०९/२०२२ रोजी सपोनि अतुल मोहनकर यांना गुप्त बादमी दाराकडुन बातमी मिळाली की,वाशिम ते हिंगोली रोडवर पंचाळा फाटा येथील प्रभाकर वानखडे हे त्यांचे मालकीचे आयुष वाईनवारमध्ये हलक्या दर्ज्याचे विदेशी दारू मध्ये स्पिरीट सारखे द्रावण मिसळवून वेगवेगळ्या कंपनीचे विदेशी बनावट दारू तयार करून
तित्यांच्या बार मध्ये वाहतुक पासवर आलेल्या विदेशी दारूच्या रिकाम्या बाटल्यामध्ये भरून त्याचनावटी विदेशी विकी करित आहे. ती बनावटी विदेशी दारू प्रापन केल्याने मानवि जिवीत्वास व आरोग्यास हानिकारक आह हे माहित असतांना सुध्दा आयुष वाईन बार चे मालक प्रभाकर वानखडे हे बेकायदेशीर विकी करत आहे अश्या
माहिती वरून स्था. गु. शा. वाशिम व राज्य उत्पादन शुल्क वाशिमचे पथक सोबत घेवून संयुक्तरित्या आयुष वाईन
बारवर रेड केली असता तेथे वेगवेगळया कंपनीची वेगवेगळया ब्रांडची विदेशी दारू किं ६३९३५ रूची व देशी दारू लावणी संत्रा ३३६० रुची, हलक्या दर्ज्याची विदेशी दारू प्लास्टीक बॉटलमध्ये किंमत ३५०० रू ची ऊग्रवासाची स्पिरिट किंमत १००० रू आणि बनावट विदेशी दारू बनविण्याकरिता उपयोगांत येणारे प्लास्टीकचे झाकण किं १६६० रू असा एकुण ४४३५७९ रु चा माल मिळुण आल्याने पंचासमक्ष जप्त करून ताब्यात घेवून आयुष बारचे मालक प्रभाकर महादु वानखडे व मुलगा आयुष प्रभाकर वानखडे दोन्ही रा. संतोषीमाता नगर वाशिम यांचे विरुद्ध पोलीस स्टेशन वाशिम ग्रामीण येथे अपराध क्रमांक ३२९/ २२ कलम ३२८,२७३१८८.३४ भादवि सह कलम ६५ (ई). ८१.८३.१०३,१०८ मु.प्रो. अॅ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
सदरची कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक श्री बच्चन सिंह, अपर पोलीस अधिक्षक गोरख भामरे यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक सोमनाथ जाधव, सपोनि अतुल मोहनकर पोउपनि शब्बीर खान पठाण पोहवा किशोर चिंचोळकर, सुनिल पवार, पोना राजेश राठोड, पोका डिगावर मोरे, चापोका शेखर घोडे व विशाल मोहळे तसेच राज्य उत्पादन शुल्क वाशिमचे निरीक्षक गोपीनाथ पाटील दुयम निरीक्षक किरण वगई रंजिन आडे, नितीन तिडके, ललित खाई स्वनील लांडे यांनी सहभाग नोंदविला आहे.
प्रतिनीधी:-फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206