मनिष गुडधे
अमरावती शहरात आणखी एका आंतरधर्मीय विवाह प्रकरणानंतर हिंदू संघटना आक्रमक झाल्या आहेत, एका मुलीला पळवून आंतरधर्मीय विवाह केल्याचा प्रकरण समोर आल्यानंतर खासदार नवनीत राणा हिंदू संघटनेच्या कार्यकर्त्यांसह राजापेठ पोलीस ठाण्यात दाखल झाल्या आणि मुलीला समोर आणण्याची मागणी केली. लग्नानंतर मुलीला डांबून ठेवल्याचा आरोप त्यांनी केला; याप्रकरणी कांदे बटाटे विक्री करणाऱ्या एका युवकाला पोलीसांनी ताब्यात घेतल आहे.
नवनीत राणा यांनी म्हटलं आहे की पतीने मुलीला डांबून ठेवले असल्याची तक्रार घेऊन मुलीचे पालक माझ्याकडे आले होते मात्र मी फोन केल्यावर पोलिसांनी माझा फोन रेकॉर्ड केला तुम्हाला माझा कॉल रेकॉर्ड करायचा अधिकार कोणी दिली.? या मुद्द्यावर खासदार नवनीत राणा यांनी अमरावती येथील राजापेठ पोलीस ठाण्यात धडक दिली यादरम्यान पोलीस आणि नवनीत राणा यांच्यात वाद निर्माण झालाया मुद्द्यावर खासदार नवनीत राणा यांनी अमरावती येथील राजापेठ पोलीस ठाण्यात धडक दिली यादरम्यान पोलीस आणि नवनीत राणा यांच्यात वाद निर्माण झालाया मुद्द्यावर खासदार नवनीत राणा यांनी अमरावती येथील राजापेठ पोलीस ठाण्यात धडक दिली यादरम्यान पोलीस आणि नवनीत राणा यांच्यात वाद निर्माण झाला. सध्या या ठिकाणी तणावाचे वातावरण असून मोठ्या संख्येने हिंदू बांधया मुद्द्यावर खासदार नवनीत राणा यांनी अमरावती येथील राजापेठ पोलीस ठाण्यात धडक दिली यादरम्यान पोलीस आणि नवनीत राणा यांच्यात वाद निर्माण झाला. सध्या या ठिकाणी तणावाचे वातावरण असून मोठ्या संख्येने हिंदू बांधव या ठिकाणी जमा झालेले आहेत.
नवनीत राणा यांनी आरोप करताना म्हटला आहे की अमरावतीची बदनामी का होत आहे 19 वर्षाची हिंदू मुलगी आहे त्या मुलाला पकडून आणला आहे रात्रीपासून चौकशी करत आहे मात्र काही समोर येत नाही मात्र मुलगी कुठे आहे याबाबत उत्तर दिले जात नाहीयेत त्या मुलाच्या परिवाराला इथे पकडून आणा एका तासात सगळं बाहेर येईल असेही राणा म्हणाले.दोन तासात मुलीचा शोध घ्या असा अल्टिमेटम राणांनी दिला या मुलांचा एक समूह आहे असा आरोप देखील राणा यांनी केला आहे माध्यमांशी बोलताना मुलीच्या पालकांनी सांगितलं की माझी मुलगी 12:30 वाजता बँकेत गेली मात्र तिच्या फोन नंबर बंद झाला आमच्या घरी तो मुलगा कधीच आलेला नाही अशी माहिती त्या मुलीच्या पालकांनी दिली