माध्यमिक विभागातुन दोन तर प्राथमिक विभागातुन एका प्रतिकृतीची जिल्हास्तरावर निवड
राळेगाव:- न्यू इंग्लिश हायस्कूल व कनिष्ट महाविद्यालय, राळेगाव येथे दिनांक 6 सप्टेंबर रोजी पंचायत समिती राळेगाव अंतर्गत तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. त्या अंतर्गत राळेगाव तालुक्यातील अनेक शाळेतील विद्यार्थी या विज्ञान प्रदर्शनित उपक्रमात सहभागी होऊन त्यानीं आपापल्या विज्ञान उपक्रम कृती प्रदर्शित केल्या. त्याच प्रमाणे या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शननिमित्त विद्यार्थ्यांना विज्ञान प्रदर्शना चे महत्व या
कार्याबाबतीत यावेळी उपस्थिका कडून माहिती देण्यात आली. यावेळी माध्यमिक विभागातुन दोन तर प्राथमिक विभागातुन एका प्रतिकृतीची जिल्हास्तरावर निवड करण्यात आली तर तालुका स्तरीय विज्ञान नाट्यउत्व मध्ये राळेगाव तालुक्यातून न्यू इंग्लिश हायस्कूल च्या नाटिकेचा प्रथम क्रमांक आला आहे.,या विज्ञान प्रदर्शनी कार्यक्रमाचे वेळी उदघाट्क म्हणून शेख लुकमान गटशिक्षणाधिकारी, राळेगाव तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्राचार्य जितेंद्र जवादे, तर प्रमुख पाहुणे म्हणून सौं. सरला देवतळे विस्तार अधिकारी राळेगाव,उपप्राचार्य विजय कचरे,पर्यवेक्षक सुरेश कोवे तर विज्ञान प्रदर्शनीचे परीक्षक म्हणून प्रमोद भेंडे ,भारती ताठे, व्ही. एन.लोंडे, अरुण कामनापुरे यावेळी उपस्थित होते तर शाळेतील तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी शाळेतील विज्ञान शिक्षक, मनीषा ईखे, रेखा कुमरे, करुणा महाकुलकर, संजय चिरडे,रेश्मा भोयर,सचिन दहिकर,निलेश गोरे, प्रतीक ताकसांडे आदी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी वर्ग व विदयार्थ्यांनी यावेळी मोठा प्रतिसाद दिला…..