पालघर – न दैन्यम न पलयानम ब्रिदवाक्य घेऊन पत्रकारांचे न्याय व हक्कासाठी संपूर्ण देशभरात कार्यरत असलेली शासन मान्यताप्राप्त पत्रकार संरक्षण समिती पालघर जिल्हाध्यक्ष पदी प्रा.मनोज कामडी सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार यांची निवड आज दिनांक १० सप्टेंबर २०२२रोजी शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन असलेल्या शिरपामाळ येथील श्रवण प्रतिष्ठान मध्यवर्ती कार्यालय जव्हार येथे करण्यात आली आहे.यावेळी प्रमुख मान्यवर राम खुर्दळ यांचे जव्हार तालुक्यातील पत्रकार बांधवांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले व सर्वाचा परिचय करून घेतला.
प्रा.मनोज कामडी हे सामाजिक कार्यकर्ता व पत्रकार असून पत्रकारिता क्षेत्रात व सामाजिक क्षेत्रात निस्वार्थपणे गोर गरीब जनता, व आदिवासी बांधवानसाठी धावून जाऊन वेळोवेळी आपले योगदान कायम देत असतात ते विविध सामाजिक संस्थासोबत काम करीत असून त्यांच्यावर एक जबाबदारी देत पत्रकार संरक्षण समितीचे संस्थापक अध्यक्ष विनोद पत्रे यवतमाळ ,राज्य उपाध्यक्ष रामनाथ खुर्दळ नाशिक यांनी नियुक्तीपत्र दिले असून ते संपूर्ण पालघर जिल्ह्यातील पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी नक्की लढतील व पत्रकारांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध लढतील आशा व्यक्त करीत पत्रकार क्षेत्रातून व सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.यावेळी राम खुर्दळ नाशिक यांनी उपस्थित सर्व नवनिर्वाचित पत्रकार बांधव यांना ग्रामीम भागात काम करीत असतांना आलेले अनुभव, पत्रकारिता क्षेत्रात काम करत असताना ग्रामीण आदिवासी भागात त्यांनी केलेले प्रयत्न, तसेच विविध सामाजिक क्षेत्रात आतापर्यंत केलेल्या कार्याविषयी मार्गदर्शन केले.यावेळी नाशिक शहराध्यक्ष राजेंद्र भांड, जव्हार तालुक्यातील पत्रकार सोमनाथ टोकरे, प्रदीप कामडी, सुनील टोपले, व इतर पत्रकार बांधव उपस्थित होते.