Home मराठवाडा गेल्या सात वर्षांपासून प्रलंबित असलेले मैत्रेय प्रकरण निकाली निघाले नाही तर लाखों...

गेल्या सात वर्षांपासून प्रलंबित असलेले मैत्रेय प्रकरण निकाली निघाले नाही तर लाखों गुंतवणुकदार मंत्रालयावर धडकणार…

2019

 

संघर्ष समितीच्या प्रदेशाध्यक्षा संगीता कदम यांचा इशारा

वकिलांशी चर्चा करतांना मैञेय गुंतवणुकदार

जालना -लक्ष्मण बिलोरे

मैत्रेय कंपनी बंद पडून सात वर्षे झाली आहेत परंतु अजूनही लाखों गुंतवणुकदारांना परतावे न मिळाल्याने मैत्रेय कंपनीचे एजंट आणि गुंतवणूकदार हतबल झाले आहेत. गेल्या सात वर्षांत राज्यभरात राज्यभरात आंदोलने झाली.शासन आणि प्रशासनाकडे निवेदने दिली.मात्र
निगरगट्ट राज्यकर्ते दखल घेत नसल्याने मुंबईत मंत्रालयासमोर लाखों गुंतवणूकदारांना घेवून आंदोलन करण्यात येईल असा इशारा संघर्ष समितीच्या प्रदेशाध्यक्षा संगीता कदम यांनी दिला आहे.

प्रदेशाध्यक्षा कदम म्हणाल्या की,मैत्रेय ग्रुप आफ कंपनीच्या संचालकांनी राज्यातील लाखों गुंतवणूकदारांची कोट्यवधी रूपयांची फसवणूक केली आहे.त्यामुळे गुंतवणूकदारांवर उपासमारीची वेळ आली आहे.मैत्रेयच्या एजंट,प्रतिनिधींवर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. मैत्रेय फसवणूक प्रकरणी नाशीक‌ येथील सरकारवाडा पोलिसठाण्यात गुन्हा दाखल असून मैत्रेय कंपनीच्या संचालकांना अटक करण्यात आलेली आहे.मैत्रेय प्रकरण न्यायप्रविष्ट असून कोर्टाचे आदेश असतानाही शासकीय आणि प्रशासकिय स्तरावर मैत्रेय प्रकरण गांभिर्याने घेतले जात नाही.मैत्रेयच्या जप्त प्रॉपर्टीज शासनाच्या दिरंगाईमुळे लिलाव प्रक्रियेत येत नसल्याने गुंतवणुकदारांना परतावे मिळण्यास विलंब होत आहे,असा आरोप संघर्षच समितीच्या वतीने करण्यात आला आहे.मैत्रेय प्रकरणी सोशल मिडियांवरही गुंतवणुकदारांचा शासनाच्या विरोधात मोठा आक्रोश सुरू असून शासनाने मैत्रेय प्रकरणी दखल न घेतल्यास राज्यातीलाखों गुंतवणूकदार मंत्रालयासमोर जन आंदोलन करण्याच्या तयारीत असल्याचे मैत्रेय संघर्ष समीतीच्या प्रदेशाध्यक्षा संगीता कदम यांच्यासह रामराव मोरे ,विष्णू संकपाळ,कल्पना महाजन, निरज कांबळे,अनिता पाटील,सुमन कदम,पुरूषोत्तम गांगुर्डे,मयूर,मालपानी,किशोर कांबळे,शिवाजी आर्दड,बंडू मुदगलकर,विजयालक्ष्मी महाजन,राहूल लंकेे,जाधव यांनी दिला आहे.