Home यवतमाळ डॉ. निरज वाघमारे यांच्या तर्फे मोफत गरबा प्रशिक्षण.

डॉ. निरज वाघमारे यांच्या तर्फे मोफत गरबा प्रशिक्षण.

231

( गरबा नाईटस विजेत्यांना मिळणार “हे” आकर्षक बक्षिसे.)

यवतमाळ / हरीश कामारकर
गणेशोत्सवानंतर आता सर्वत्र नवरात्रोत्सवाचे वेध लागले आहेत. यवतमाळातील नवरात्रोत्सव हा देशात दुसऱ्या क्रमांकावर प्रसिद्ध आहे. कोलकत्ता नंतर यवतमाळातच नवरात्र उत्सवाची धूम मोठया प्रमाणात पाहायला मिळते. तर नवरात्रोत्सव म्हणजे गरबा, दांडिया खेळण्याचा जणू उत्सवच. देवीची आराधना गरबा, दांडियाच्या रूपातही करीत असतो. या उत्सवात रंग भरण्यासाठी यवतमाळातील युवा सामाजिक कार्यकर्ते डॉ. निरज वाघमारे यांनी विशेष गरबा दांडिया प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले आहे. शिबिरात सहभागी होऊन नवरात्रोत्सवामध्ये आनंद द्विगुणित करण्याची संधी महिलांना यानिमित्ताने उपलब्ध झाली आहे.
यवतमाळ शहरातील युवा सामाजिक कार्यकर्ते डॉ. निरज वाघमारे हे तान्हा पोळा, घरगुती गणपती सजावट स्पर्धा, रांगोळी स्पर्धा यासारखे अनेक सामजिक व धार्मिक कार्यक्रम नेहमीच राबवित असतात. यातच आता नवरात्रोत्सव जवळ आल्याने महिला वर्गासाठी खास आकर्षण आणि आवडीचा असलेला दांडिया गरबा हा खेळ. या खेळाचे शिकवणी वर्ग व व्यासपीठ शहरात ऊपलब्ध नसल्यानें येत्या १९ सप्टेंबर पासून २४ सप्टेंबर पर्यंत वाघापुरातील पीपल्स कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रांगणात सायंकाळी ७.०० ते ८.३० पर्यंत महिलांना मोफत गरबा प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तर दिनांक २४ सप्टेंबर ला या प्रशिक्षणाची सांगता होउन त्यादिवशी गरबा नाईटस् चे आयोजन करण्यात आले. या गरबा नाईटस् मधील विजेत्यांना विविध बक्षिसे देण्यात येणारं असुन यातील पहिल्या विजेती महिलेला सोन्याची नथ, व्दितीय क्रमांकास पैठणी साडी, तृतीय पारितोषिक मोत्याचा हार तर दोन प्रोहत्सानपर बक्षिस देण्यात येणारं असुन ३ ते १४ वयोगटातील स्पर्धकांसाठी प्रथम पारितोषिक ११११/- रुपये, व्दितीय ७७७/- तर तृतीय ५५५/- रुपयांची रोख पारितोषिक देण्यात येणारं आहे.
तर या प्रशिक्षणात सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी डॉ. निरज वाघमारे यांच्या नेताजी नगर दारव्हा रोड वरील जनसंपर्क कार्यालयात नोंदणी करावी ही नोंदणी व प्रवेश निःशुल्क असुन अधिक माहिती करिता ७७५५८८४५६७ या क्रमाकांवर संपर्क साधावा अशी माहिती आयोजक डॉ. निरज वाघमारे यांनी दिली.