Home यवतमाळ मुख्याधिकाऱ्यांच्या बदली मागे कुणाचा “हात”

मुख्याधिकाऱ्यांच्या बदली मागे कुणाचा “हात”

760

( मुख्याधिकारी मडावी समर्थकांत आंदोलनांची धग कायम )

यवतमाळ/ प्रतिनिधी
यवतमाळातील दबंग मुख्याधिकारी म्हणून मागील काळात नावारूपास आलेल्या यवतमाळ नगर परिषदेच्या मुख्याधिकारी तथा विद्यमान प्रशासक माधुरी मडावी यांची तडकाफडकी बदली झाल्याने यवतमाळच्या राजकारणासह सर्वच क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
एक – दिड वर्षांपूर्वी मुख्याधिकारी म्हणून कार्यान्वित झालेल्या माधुरी मडावी यांनी शहराची स्वच्छतेच्या बाबतीत पुसल्या गेलेली ओळख हे आपल्या कार्याच्या स्थायीभाव ठेवून शहराची मिटलेली ओळख परत मिळवून देण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा चालू केली असे मत शहरांतील जनतेचे आहे. याचबरोबर मडावी यांनी शहरातील अतिक्रमणाचा व सामाजिक विदृपीकरणाचा मुद्दा हातात घेऊन शहरातील रस्त्यावरील अतिक्रमण व मोठ्या चौकातील होर्डिंगचा सुफडा साफ करून टाकला होता. तर ऐतिहासिक वास्तूंची ओळख असलेल्या नाट्यगृह, पाच कंदिलचौक, जाजु चौक, संविधान चौक व इतर स्मारकांचा मुद्दा हातात घेऊन या घटकांचे सौंदर्यकरण करून शहराच्या सौंदर्यात भर पाडली. तर याचं बरोबर अजून १५ जागेच्या सौंदर्यकरण करण्याची मोहीम मुख्याधिकारी मडावी यांनी हाती घेतली होती. यामुळे मडावी यांनी शहरातील जनतेच्या मनात आपल वेगळ स्थान निर्माण केले.
तर दुसरीकडे बसस्थानक चौक पासून पांढरकवडा रोड वरील वादाच्या भोवऱ्यात सापडलेला सायकल ट्रॅक, मेडिकल चौकातील अतिक्रमण, रस्त्याच्या कडेवरील फेरीवाले हटाव, जमीन खरेदी – विक्रिवरील १% कर, सफाई कामगारांना शिस्तीचे आणि वेळेचे धडे व घनकचरा व्यवस्थापनात सफाई कामगार, नगरपरिषदेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर “हिटलरशाही”, राजकिय नेत्यांच्या बॅनरबाजीत दुजभाव आणि मुख्यतः अंकुश या काही कारणांमुळे काही गटांकडून मुख्याधिकाऱ्यांना असंतोषला आणि विरोधाला सामोरे जावे लागत आहे. यातच आता मुख्याधिकाऱ्याच्या तडकाफडकी बदलीचे आदेश जारी झाल्याने यवतमाळ शहराच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे या बदलीच्या मागे कोणाचा “हात” आहे.? अश्या चर्चा शहराच्या प्रत्येक क्षेत्रात रंगत आहे.
तर ही बदली तात्काळ रद्द करावी यासाठी मागील काही दिवसापासून शहरातील अनेक सामाजिक संघटना, राजकीय पक्ष, लोकप्रतिनिधी व सामाजिक कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहे. तर ही बदली योग्य असून या बदलीचे समर्थन करत मडावी यांच्या विरोधातील शहरातील अन्य सामाजिक संघटना, राजकीय पक्ष, लोकप्रतिनिधी व सामाजिक कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहे.
त्यामुळे आता या बदली प्रक्रियेवर काय निर्णय होतो याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. पण त्याही पहिले या बदली प्रक्रियेत कोणाचा “हात” आहे. याबद्दल विविध चर्चा व मतमतांतरे असुन या बदलीचे मुख्य सूत्र हे शहरातील राजकिय गोटातून हलल्याची शक्यता समोर येतं आहे.
यवतमाळ शहराच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजाविणाऱ्या मुख्याधिकारी माधुरी मडावी यांची बदली तात्काळ रद्द करावी यासाठी समर्थकांमध्ये आंदोलनाची धग अजूनही कायम असल्याने त्याच पार्श्वभूमीवर आज यवतमाळ शहरातील सामाजिक कार्यकर्ते गोलू उर्फ अशोक डेरे व हेमंत कांबळे यांनी आमरण उपोषणाचा पावित्रा घेऊन नगर भवना समोर बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे.

————– कोट ———

यवतमाळ शहराचा सर्वांगीण विकास योग्य पद्धतीने मुख्याधिकारी तथा प्रशासक माधुरी मडावी करीत आहेत. आमच्या यवतमाळ शहराची स्थिती पाहता आपल्या माध्यमातुन कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी बेधडक कामगिरी करीत असून नागरिकांच्या अडचणी लक्षात घेवून नागरिकांना असलेल्या अडचणी व वर्षानुवर्षापासून सुरू असलेले वादांचे निवारण करून शहरातील घनकचरा व्यवस्थापनाचे कामकाज योग्यरित्या पार पाडीत आहे. परंतु काही राजकीय मंडळी दबावतंत्राचा वापर करून मुख्याधिकाऱ्यांचा कार्यकाळ संपण्यापुर्वीच यवतमाळचे विकास कामे थांबविण्याच्या दृष्टीने त्यांची हेतुपूरस्पर बदली करून आम्हा यवतमाळकरांना विकासापासून वंचित करण्याचा डाव रचित आहेत. परंतु असे न होऊ देता हा डाव हाणून पाडण्यासाठी व मुख्याधिकाऱ्यांची बदली रोखण्यासाठी आम्ही ही भूमिका घेत आहो..

– गोलू उर्फ अशोक डेरे
उपोषणकर्ते