अब्दुल कय्युम
औरंगाबाद , दि. ३१ :- जालना रोडवरील गाडे जळंगाव शिवर गोल्डी धाब्याच्या समोर 30 जानेवारी च्या रात्री दोन ते अडीच च्या सुमारास भीषण अपघात, जालना कडे जाणाऱ्या क्रूजर क्र.MH28.AN 3620 बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यातील असून इगतपुरी येथून देवदर्शना होऊन गावी परतत असताना गाडे जळंगाव शिवार गोडी धाब्या समोर ट्रेलर क्र.MH40.BJ 8111 क्रुझर मागच्या बाजूने जाऊन धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात चार जण ठार नऊ जखमी सगळ्यांना औरंगाबाद शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले
मृत्यूमध्ये सिंदखेड राजा चे लोकमतचे पत्रकार काशिनाथ देवराव मेहञे वय 62, रवि बबन जाधव वय 32 दोघे राहणार नशिराबाद तालुका सिंदखेडराजा, संगीता गणेश फुंदे वय 45 राहणार तांदुळवाडी तालुका सिंदखेड राजा, ऋषीधर देवराव तिडके वय 55 राहणार गोंदेगाव तालुका जालना, औरंगाबाद ग्रामीण चे DYSP डॉ नेहुल. करमाड पोलीस ठाण्याचे PI खेतमाळस, यांनी घटनास्थळी पाहणी केली पुढील तपास करमाड पोलिस ठाण्याचे एपीआय प्रशांत पाटील करत आहे ,
पत्रकारिता क्षेत्रातिल कोहिनुर हिरा हरपला…
काशिनाथ मेहेत्रे हे तात्या नावाने प्रसिद्ध होते गेल्या 28 वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रामध्ये कार्यरत होते तसेच शेतकरी संघटनेमधे शरद जोशी यांच्या सोबत त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रशानावर त्यांनी वेळोवेळी आवाज उठावला माळी सोयरिक संकेत स्थळ च्या माध्यमातून शेकडो युवक युवती विवाह जुळवले त्यांच्या मनमिळावू स्वभाव मूळे ते सिंदखेडराजा तालुक्यात परिचित होते त्यांच्या निधना मुळे सर्वत्र दुःख वयकत केले जात आहे , तालुक्यातील पत्रकारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे .