Home महत्वाची बातमी मोकाट गोवंशाच्या लम्पी प्रतिबंधासाठी ‘बी काइंड’

मोकाट गोवंशाच्या लम्पी प्रतिबंधासाठी ‘बी काइंड’

208

उपचार केल्याचा ‘आरेंन्ज अलर्ट’


यवतमाळ (प्रतिनिधी) महाराष्ट्रातील २१ जिल्ह्यात जनावरातील विषाणुजन्य लम्पी या गंभीर त्वचारोगाचा वाढता प्रसार बघता शासन प्रशासन पशुपालकांसाठी पुढे सरसावले आहेत. मात्र मोकाट गोवंशांचे संरक्षणार्थ कोण ? या प्रश्नाचे उत्तरदायीत्व पुन्हा एकदा ‘बी काइंड’ या पशुकल्याण सेवासंस्थेने स्विकारले आहे. देशात एक लाख जनावरे मृत्युमुखी पडलेल्या या भीषण आजाराचा प्रतिबंध करण्यासाठीच्या निशुल्क औषधोपचारसाठी संस्थेच्या प्रशुस्नेही युवकांची धडपड यवतमाळच्या रस्त्यांवर दिसते आहे.
गोवंशातील लम्पी आजाराचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे निदर्शनास येताच शहरातील बी काइंड या पशुस्नेहींनी आपल्या संस्थेची आपातकालीन बैठक घेत या प्रश्नी प्रतिबंधात्मक औषधोपचाराची निशुल्क सेवा देण्याचा संकल्प केला. शहर आणि लगतच्या परिसरात किमान एक हजारावर मोकाट गोवंश आहे. विषयाचे गांभीर्य लक्षात घेत या जनावरांना प्रतिबंधात्मक गोळ्यांचे सेवन करण्यासाठीच्या कार्याचा शुभारंभ कुठल्याही औपचारीक कार्यक्रमाशिवाय थेट प्रारंभ करण्यात आला. आपले शिक्षण, नोकरी, व्यवसाय सांभाळुन संस्थेच्या युवकांनी केवळ ३ दिवसात २५० पेक्षा जास्त गायी, बैलांचा औषधोपचार केला. या मोकाट जनावरांना कुठल्या खाद्य पदार्थातुन गोळ्या चारण्याचे कार्य मुळीच सोपे नाही. मात्र या बहुतांश मोकाट जनावरांशी नियमीत सेवाशुश्रुषा करणाऱ्या युवकांशी नाळ जुळाल्याने महिनाअखेरपर्यत ही औषधोपचार मोहीम फत्ते करण्याची मानस संस्थेने केला आहे.
शहरात आतापर्यत दर्डा नगर, संकटमोचन परिसर, आठवडी बाजार, आर्णी रोड, उमरसरा या परिसरात हे सेवाकार्य आटोपले आहे. गोळ्यांचे सेवन केलेल्या जनावरांची ओळख व्हावी, पुर्नउपचाराचा धोका उद्भवु नये याकरिताचा अलर्ट म्हणुन या मोकाट जनावरांच्या शिंगाला ऑरेंन्ज रंग लावण्यात येत आहे. पशुसंवर्धन अधिकारी डॉ बी बी चव्हाण यांचे मार्गदर्शनात संस्थेचे दिपक जोशी, अमोघ व्होरा, अभीजीत गुल्हाने, प्रसाद वाजपेयी, शताक्षी कांबळे, सौरभ नाहर, अरिहंत गुगलिया, ऋषभ वाधवानी, कस्तुर राऊत, अक्षय बानोरे, निशांत सायरे, भुषण तलवारे, राजश्री मामीडवार, ओम बहाले, चैतन्य सोनार, कामेश भोयर आदी पशुस्नेही सेवाकार्यात सहभागी झाले आहेत.
यवतमाळकरांनी आपल्या परिसरातील मोकाट गोवंशाच्या संरक्षणार्थ त्यांचे निशुल्क औषधोपचाराकरिता बी काइंड या पशुकल्याण सेवासंस्थेशी संपर्क साधण्याचे आवाहन संस्थेच्या पशुस्नेहींनी केले आहे.