झरी – तालुक्यातील मुकूटबन या गावामध्ये आदर्श हायस्कुल मधील हिंदुस्थान स्काउट गाईड चे विद्यार्थी यांनी पथनाट्य सादर केलं. दिवसेंदिवस पथनाट्य एकल प्रयोग अशा उपक्रमातुन जनजागृती करण्याचे प्रमाण बंद पडताना दिसत आहे. कितीतरी विद्यार्थ्यांना पथनाट्य चा अर्थ देखील ठाऊक नाही. धावपळीच्या या जिवनात लोकसंख्या सोबत वाहनांची संख्या देखील भरगच्च झाली आहे. आणि यामध्येच अपघाताचे परिणाम दररोजच पेपरला वाचायला मिळते. कोणि मद्य प्राशन करून गाडी चालवितो तर कोणि बिना हेल्मेट ने, कधीकधी वाहनाच्या वेगाची क्षमता जास्त असल्यामुळे देखील अपघात होतो. अपघात झाल्यानंतर सध्या परिस्थीती दवाखान्यात न्यायचे सोडुन अगोदर फोटो काढण्यात लोकं व्यस्त होतात. हिच बाब जनतेच्या लक्षात आणुन देण्यासाठी या विद्यार्थ्यांनी मुकूटबन च्या मुख्य मार्गावर पथनाट्य करून जनजागृती करण्याचा छोटासा प्रयत्न केला. यामध्ये सुरूवातीला एक मद्य पिऊन सायकलने येतो व दुसऱ्याला टक्कर देताच अपघात घडतो. लगेच सायकल घेऊन तो पळुन जातो. दुसरे येऊन फोटो काढतात व तेवढ्यात एक 108 एम्बुलेंस ला फनो करून पेशंट ला दवाखान्यात घेऊन जातो. दुर्दैवाने पेशंट उशिरा पोहोचल्याने जिव गमावतो. अलिकडे हि वास्तविक परिस्थिती या पथनाट्यातुन विद्यार्थ्यांनी मांडली. व सोबतच वाहन चालविताना हेल्मेट, गाडीची वेग मर्यादा व शुद्ध स्थिती ठेऊन वाहन चालवावे आणि आपला जिव सुरक्षीत ठेवावा. तसेच अपघात झाल्यास फोटो काढण्याऐवजी 108 एम्बुलेंस ला संपर्क करा व जिव वाचविण्यासाठी मदत करा. असा संदेश या विद्यार्थ्यांनी पथनाट्यामधुन दिला. यात रोहन मडपाचे, सौरभ गोडे, रिशीकांत पैसटवार, दर्शन गोडे, अनिकेत खोबरे, संघर्ष वाघमारे, अजय गोन्लावार, कुणाल नागतुरे, दृप चौधरी, साईकिरण धुर्वा, रूपेश तोकलवार, गणराज पारशिवे, नरजिश शेख, यश राऊत, क्रिश टेकाम, साहिल मडावी या विद्यार्थ्यांचा समावेश होता. यावेळी आदर्श हायस्कुल मुकूटबन चे शिक्षकवर्ग व हिंदुस्थान स्काउट गाईड चे पदाधिकारी उपस्थित होते.