यवतमाळ – नाना पटोले महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष यांचा निषेध व्यक्त करून त्यांनी तेली समाजाची जाहीर माफी मागावी, अशी मागणी निवेदनाद्वारे महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा यवतमाळ जिल्हा शाखा तर्फे करण्यात आली. देशाचे प्रधान मंत्री तसेच तेली समाज बांधव नरेंद्र मोदी यांचें बाबत जातीवाचक वक्तव्य करणारे महाराष्ट्र कॉंग्रेस चे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जाहीर माफी मागावी व तेली. तसेच ओ बी सी समाज बाबत केलेल्या वक्तव्यावर दिलगिरी व्यक्त करावी अन्यथा राज्यभर आंदोलन करण्यात येईल. या करिता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्य मंत्री देवेंद्र फडणवीस यांना जिल्हाधकार्यांमार्फत महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा यवतमाळ जिल्हा शाखा तर्फे आज निषेध व्यक्त करून निवेदन देण्यात आले, यावेळी जिल्हाध्यक्ष दिलीप बारडे, कार्याध्यक्ष संतोष डोमाळे, विभागीय कार्याध्यक्ष राजेश गुल्हाने, महासचिव विजय बिजुळकर, कोषाध्यक्ष रमेश जयसिंगपूरे, सेवा आघाडी कार्याध्यक्ष विजय तायडे, उपाध्यक्ष विलास गीरोळकर, सचिव सुनील गुलवाडे, महिला आघाडी अध्यक्ष सुमन साकरकर, कार्याध्यक्ष डॉ. रुपाली गिरोळकर, उपाध्यक्ष रश्मीताई गुल्हाणे, सेवा आघाडी अध्यक्ष सुरेश झोपाटे ,युवा आघाडी अध्यक्ष चेतन भुराने व इतर पदाधिकारी उपस्थित होते.