पर्यावरण संरक्षण गतीविधीची मोहीम…!
यवतमाळ (प्रतिनिधी) ता. पर्यावरण संरक्षण गतीविधी अंतर्गत यवतमाळकर संस्थांनी मिळुन वाघाडी नदी स्वच्छतेचा ध्यास घेतला असुन रविवारी सकाळी शहरातील पर्यावरण प्रेमी, समाजसेवक आदी विवीध क्षेत्रातील मान्यवरांनी एकत्रित येत वाघाडी येथे जलपुजन करित या पर्यावरण संवर्धक मोहीमेचा श्रीगणेशा केला.
यवतमाळकरांना नियमीत पाणी पुरवठा होणाऱ्या निळोणा नदीकडे वाहत जाणाऱ्या वाघाडी नदी वजा नाल्याचे पाणी अनेक कारणांमुळे दुषित होते आहे. या कारणांमुळे या परिसरात दुर्गंधी पसरणे, सुशोभीकरणात बाधा निर्माण होणे, पाण्याचे स्त्रोत दुषित होणे, परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येणे, शेतीला रासायनीक पाणी मिळाल्याने पिकांची पोषकता बाधीत होणे, विसर्जनासाठी येणाऱ्या मुर्त्यांची नकळत विटंबना होणे, प्लास्टीकचा कचरा तुंबुन राहणे, जलस्त्रोत लवकर आटणे, मुक्या जनावरांना विषबाधा होणे, परिसरातील जैवविवीधता बाधीत होणे आदी अनेक दुष्परिणाम होत आहेत.
या सर्व समस्यांचे निर्मुलनाकरिता पर्यावरण संरक्षण गतीविधी अंतर्गत यवतमाळातील सामाजिक संस्था, संघटनांनी एकत्रीत येऊन कार्य करण्याचे संकल्प केला आहे. याकरिता या वाघाडी परिसरात नियमीत श्रमदान, स्वच्छता मोहीम, जलसंवर्धन, निर्माल्य व्यवस्थापन, जनजागृती अभियान, प्लास्टीक नियोजन आदी विवीध सेवा उपक्रम घेण्यात येणार आहेत.
रविवारी वाघाडी नदीचे जलपुजन झाल्याबरोबर लगेच येथील जवळपास १०० फुट परिसरात मानवी साखळी करुन श्रमदानातुन स्वच्छता मोहीम राबवीत पाण्यात पडलेल्या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेश व लक्ष्मींच्या मुर्ती, निर्माल्य, प्लास्टीक, मुर्त्यांवरील शोभेच्या वस्तु काढण्यात आल्या. पाणी आणि पुलापासुन दुर मोठा खड्डा करण्यात येऊन त्यामध्ये या मुर्ती रितसर विसर्जीत करण्यात आल्या. या अभियानात युवा वाहिनी, युनीटी कर्मयोगी संस्था, माजी सैनिक संघटना, सावली स्वयंसेवी संस्था, अध्यात्मिक मंच, जनजागृती समिती, एमएच २९, वसुंधरा फाउंडेशन, पतंजली समिती, युवा मोर्चा, संस्कृती संवर्धक मंडळ, बी काइंड, आयसीआयसीआय लोंम्बार्ड, युथ फाउंडेशन, डॉ हेडगेवार सेवा समिती आदी संस्था व संघटनांच्या वतीने सर्वश्री अजयजी मुंधडा, विलासराव देशमुख, धनंजय पाचघरे, मोहन केळापुरे, संतोषजी मुत्यलवार, संतोष भोयर, संकल्प डांगोरे, प्रवीण बंडेवार, नितीन गिरी, दिनेश चिंडाले, विनोद आरेवार, वर्षा पडवे, अश्विन सवालाखे, राहुल दाभाडकर, अभीजीत गुल्हाने, शैलेश राव, अभय जोशी, प्रतिक तराळकर, अभय गुप्ता, श्रीजय थेटे, भुषण ढोबळे, विशाल ढोबळे, निरंजन होले, प्रणय जगताप, योगेश इंगळकर, अमित बोबडे, स्पप्नील पथे, डॉ विश्वास, सुभाष मळघने, आशिष विंचुरकर, छबुजी गुडमे, विशाल धनकसार, रामचंद्र ढोबळे आदींनी सहकार्य केले.
या मोहीमेसाठी संस्थांचे पदाधिकारी महाराष्ट्र जीवन प्राधीकरण, नगर परिषद, जिल्हा परिषद, जलसंधारण या विभागांना मदतीसाठी साकडे घालणार आहेत. पर्यावरण संरक्षण गतीविधी अंतर्गत शुक्रवारी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची भेट घेऊन त्यांना विषयाचे गांभीर्य विषद करित तसे निवेदनही दिले. या अंतर्गत गणेशोत्सवादरम्यान वाघाडी परिसरात जनजागृती मोहीम, निर्माल्य व्यवस्थापन, स्वच्छता मोहीमही राबवीण्यात आली होती.
येणाऱ्या प्रत्येक रविवारपासुन पर्यावरण विषयात अग्रेसर असलेल्या स्वयंसेवी संस्था, संघटनांच्या सहकार्याने ही मोहीम व्यापक करण्यात येणार आहे. या मोहीमेत विद्यार्थी व परिसरातील ग्रामस्थांचाही सहभागी होत असुन पर्यावरण प्रेमी, समाजसेवक, संस्था, संघटना, यवतमाळकरांनी स्वयंस्फुर्तपणे सहभागी व्हावे असे आवाहन पर्यावरण संरक्षण गतीविधी तर्फे करण्यात आले आहे.