Home जळगाव बहुजन क्रांती मोर्चाचे वतीने पुकारण्यात आलेल्या भारत बंदला रावेर मध्ये शंभर टक्के...

बहुजन क्रांती मोर्चाचे वतीने पुकारण्यात आलेल्या भारत बंदला रावेर मध्ये शंभर टक्के प्रातिसाद

171

निकलोबाहर मकानो से – जंग लडो बेईमानोसे

शरीफ शेख

रावेर , दि. ३१ :- येथे बहुजन क्रांति मोर्चा व पाठींबा दिलेल्या अनेक पक्ष व संघटनेचे पदाधिका-याच्या वतीने रावेर शंभर टक्के बंद करुन छोरिया मार्केट पासुन शेकडो कार्यकर्ते व पदाधीकारी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयास पुष्पहार अर्पण करुन तहसिल कार्यालयात मोर्चाचे रुपांतर सभेत झाले. यावेळी केंद्र शासनाने एन.आर.सी,सी.ए.ए.व एन.पी.आर सारखे गैरसंविधानिक कायदे करुन भारत देश भरामध्ये भारतीय बहुजन बांधवांनमध्ये नागरिकत्वाची खुप मोठी धुडगुस कशी घातली आहे.या विषययी बहुजन क्रांती मोर्चा संयोजक रावेर नितीन गाढे,‍ कामगार नेते दिलीप कांबळे,निळे निशाण सामाजिक संघटनेचे अध्यक्ष आनंदभाऊ बाविस्कर,एम.आय.एमचे शेख वसीम,मुस्लीम पंच कमिटीचे शेख. गयास शेख रशीद,मौलाना हाफीज मुरतुजा,यानी मार्गदर्शन केले.यावेळी म.तहसिलदार उषाराणी देवगुणे यांना विविध मागण्याचे निवेदन देण्यात आले.

सविस्तर वृत्त असे की, आज सकाळी 10 वाजेला छोरिया मार्केट जवळ सर्व कार्यकर्ते पदाधाकरी एकत्रीत येऊन छोरिया मार्केट ते तहसिलदार कार्यालय येथे शेकडोविविध पक्ष संघटनेचे कार्यकर्ते व पदाधीका-या इ.व्ही.एम.हटाओ-देश बचाओ,निकलोबाहर मकानो से – जंग लडो बेईमानो से,डी.एन.ए.बॅसिक एन.आर.सी.- लागू करो-लागू करो,सी.ए.ए.हटाओ-देश बचाओ,एन.आर.सी. के विरोध मे भारत बंद-भारत बंद यांच्या सहविविध घोषणाणी रावेर शहरात दणाणले.

तहसिलदार यांना दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, केंद्र शासनाने एन.आर.सी,सी.ए.ए.व एन.पी.आर सारखे गैरसंविधानिक कायदे करुन भारत देश भरामध्ये भारतीय बहुजन बांधवांनमध्ये नागरिकत्वाची खुप मोठी धुडगुस घातली आहे. ज्याच्या पुर्वजांनी या मातीसाठी रक्त वाहीले आहे. त्यांना एन.आर.सी. मध्ये घेऊन देशाच्या बाहेर हाकलण्याच्या बाता देशभरात केंद्र शासन करीत आहे. इथल्या मुस्लीमांना बाहेर हाकलुन एस.सी. एस.टी.,ओ.बी.सी.,एन.टी,डी.एन.टी,व्ही.जे.एन.टी यां सर्वाना जबरदस्ती हिंदु बनवुन गुलामीच्या खाईत लोटण्याचा या बी.जे.पी.केंद्र शासनाचा प्लान आहे.देशाला ‍हिंदु राष्ट्र बनवण्याची एन.आर.सी. ही पहीली पायरी आहे.

तरी एन.आर.सी. लागु व्हावा पण डी.एन.ए.च्या आधारावर लागु करण्यात यावा. व ई.व्ही.एमवर बंदी घालुन या देशात बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्यात यावा व देशात शांतता प्रस्तापित करण्यात यावी अशी मागणी बहुजन क्रांती मोर्चा युनिट रावेर व सर्व समर्थ दिलेल्या पक्ष,व संघटनाची आहे.

म्हणुन हा भारत बंद आम्ही पुकारला आहे. मा. राष्ट्रपती साहेबांकडे आमच्या मागण्या तहसिलदार सो रावेर आपले मार्फत पोहोचविण्यात याव्या आमच्या मागण्या पुर्ण

न झाल्यास भारतभरात तिव्र आंदोलन छेडण्यात येईल व होणा-या परिणामास केंद्रातील बी.जे.पी. सरकार जबाबदार रहील. याची नोंद घ्यावी.अशा मागणीचे निवेदन तहसिलदार यांना देण्यात आले. निवेदनावर बहुजन क्रांती मोर्चा संयोजक रावेर नितीन गाढे,कामगार नेते दिलीप कांबळे, निळे निशाणचे अध्यक्ष आनंदभाऊ बाविस्कर, एम.आय.एमचे शेख वसीम,मुस्लीम पंच कमिटी शेख गयास शे.रशीद,युसुफ खान,डॉ. शेख.शब्बीर,नगरसेवक आसिफ मोहमंद,जमायते इस्लामी हिंदचे शफी उद्दीन शेख्‍ कासमसर, युसुफखा इब्राहीमखा,माजी.नगरसेवक महेंद्र गजरे,नगरसेवक सादिक ,नगरसेवक असदउल्लाखान,प्रदीप सपकाळे, संविधान जागर समिती साहेबराव वानखेडे,निळे निशाणचे धुमाभाऊ तायडे, उमेश गाढे,पिंटू वाघ, संतोष कोसोदे,सावण मेढे, चंद्रकांत गाढे, दिपक तायडेसर, सुनिल शीरतुरे, ब.स.पा,चे ईश्वर जाधव,संतोष ढिवरे,शेख कालुभाई, सै आरीफ, ईसामुद्दीन,शेख,डॉ. शेख वसीम,शेख शफी मोदिनसर, मौलाना हाफीज मुरतुजा,मुस्ती सलमान शेख सै,अफसर,शे.कामील,आय.वाय.यांच्यासह शेकडो कार्यकर्त्याच्या निवेदनावर सहया आहे.
पी .आय. रामदास वाकोळे उप. निरिक्षक सुनिल कदम यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पाठीबा
बहुजन क्रांति मोर्चा ला पाठींबा दिलेल्या पक्ष व सामाजिक संघटना, बहुजन समाज पार्टी,निळे निशाण संघटना, मुल निवाशी पार्टी, मुस्लीम पंच कमिटी, एम.आय.एम.,भारिप बहुजन महासंघ,आय.वाय.एफ.संघटना,संभाजी ब्रिग्रेड, किसान सेल,मराठा सेवासंघ,राष्ट्रीय कॉग्रेस पाटी राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी, संविधान जागर समिती, याच्यासह अन्यसंघटनाव पक्षांनी पाठीबा दिला आहे.