Home मराठवाडा सीमावर्ती भागातील ज्ञानदानाची गंगोत्री देगलूर महाविद्यालय – डॉ गोविंद नांदेडे

सीमावर्ती भागातील ज्ञानदानाची गंगोत्री देगलूर महाविद्यालय – डॉ गोविंद नांदेडे

172

पोलीसवाला ऑनलाइन मिडिया

नांदेड / देगलूर , दि. ३१ :- महाराष्ट्र, कर्नाटक व तेलंगना राज्याच्या सिमेवर असलेल्या देगलूर परिसरातील शेतकरी शेतमजुराच्या मुलामूलिंना दर्ज़ेदार उच्च शिक्षण देन्याचे , ‘विद्यार्थ्यांना माणूस बनविण्याचे व अखंड ज्ञानदानाचे केंद्र आजही देगलूर महाविद्यालय पार पाडीत आहे. आम्हा माजी विद्यार्थ्यांना ‘येथे कर माझे जुळती’ या उक्तीप्रमाणे महाविद्यालयाचे माज़ी विद्यार्थी असल्याचा सार्थ अभिमान वाटतो. येथील अनेक आठवणी चिरंतन प्रेरणा देत असतात,’ असे प्रतिपादन मा. शिक्षण संचालक डॉ गोविंद नांदेडे यांनी व्यक्त केले.
तसेच ते पुढे म्हणाले की, ‘माहिती-तंत्रज्ञानाच्या युगात गरीब आणि होतकरु विद्यार्थ्यांना घडविणारे, कुटुंब- समाज – राष्ट्राच्या जडणघडणीत महत्वपूर्ण व दीर्घकाळ योगदान देणारे शैक्षणिक केंद्र म्हणून देगलूर महाविद्यालयाचा लौकिक असून याद्वारे हज़ारो विद्यार्थ्याना प्रगती साधण्याचे बलस्थान लाभले आहे. माजी विद्यार्थी म्हणून आपल्या मातेप्रमाणे उतराई होणे कदापिही शक्य नाही.’ असा महाविद्यालयाप्रती क्रतज्ञताभाव त्यानी व्यक्त केला. या प्रसंगी
त्यांच्या समवेत मा. बालासाहेब कुंडगीर(शिक्षणाधिकारी-माध्य. जि प नांदेड), मा. बंडू अमदूरकर (उप शिक्षणाधिकारी, जि प नांदेड), श्री कपाळे सर ( उप जिल्हा अधिकारी ) , मा. जाधवर साहेब ( गटशिक्षणाधिकारी, पं.स. देगलूर ) यांनी देगलूर महाविद्यालय देगलूर येथे सदिच्छा भेट दिली. यावेळी अडत व्यापारी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रकाश पाटील बेंबरेकर , कोषाध्यक्ष विलास तोटावार, संचालक देवेंद्रजी मोतेवार, जनार्दन चिद्रावार, रवींद्रअप्पा द्याडे, प्र. प्राचार्य डॉ अनिल चिद्रावार, प्रा डॉ विठ्ठल जंबाले, पर्यवेक्षक व्ही जी कुमठेकर, प्रा व्यंकटेश शेरीकर, प्रा तुकाराम लागले आणि शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांचा यथोचित सन्मान करण्यात आला.

याप्रसंगी मा कुंडगीर यांनी महाविद्यालयातील विविध अद्यावत सुविधा बद्द्ल समाधान व्यक्त केले. तसेच या महाविद्यालयास आगामी काळात आदर्श विद्यार्थी घडविण्याची प्रक्रिया अव्याहतपणे चालू ठेवण्यासाठी शासकीय पातळीवरून सर्वतोपरी सहकार्य करण्याचे अश्वासन दिले.श्री अमदुरकर यांनी आठवणींना उजाळा दिला. या कार्यक्रमाचे संचलन व आभार प्रदर्शन मराठी विभागप्रमुख डॉ जंबाले यांनी केले.