फुलचंद भगत
वाशिम:-कर्नाटक पासिंग असलेल्या लक्झरी बसचा नंबर बदलवुन त्यावर दुसरा नंबर टाकुन सुसाटपणे पुणेच्या दिशेने निघालेल्या गाडीची माहीती पोलिसांना मिळताच ती संशयीत लक्झरी बस ऊपविभागिय पोलिस अधिकारी यशवंत केडगे यांच्या मार्गदर्शनात एपिआय मंजुषा मोरे यांनी सापळा रचुन शेलुबाजार येथे ताब्यात घेतली असुन पोलीसांनी पुढील तपास सुरु केला आहे.
मिळालेल्या माहीतीनुसार वाशिम जिल्ह्यातील कारंजा येथे एका ठिकाणी खाजगी लक्झरी बसचा नंबर बदलवुन त्याजागी दुसरा नंबर लावल्याची व सुसाटपणे नागपुर पुणे महामार्गाने गेली असल्याची गोपनिय माहीती मिळाल्यावरुन ऊपविभागीय पोलिस अधिकारी यशवंत केडगे यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार सुनिल हूड यांच्या नेतृत्वात एपिआय मंजुषा मोरे,ठाणेदार आजिनाथ मोरे आणी पथकाने शेलुबाजावर सदर गाडी ताब्यात घेतली.चौकशीअंती गाडीमधील प्रवाशांना पुढील प्रवासाची व्यवस्था करुन ती लक्झरी मंगरुळपीर पोलीस स्टेशनला जमा केली.टॅक्स चोरण्यासाठी गाडीची नंबर प्लेट बदलवली की अन्य काही गंभीर प्रकार आहे याचा मंगरुळपीर पोलिस शोध घेत असुन पुढील तपास सुरु केला आहे.
प्रतिनीधी:-फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206