Home नांदेड उर्लींग पेद्दी शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शिवलिंग दुलेवाड गुरुजी यांचे निधन.

उर्लींग पेद्दी शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शिवलिंग दुलेवाड गुरुजी यांचे निधन.

389

उद्या जानापुरी येथील आश्रम शाळेत अंत्यविधी.

नांदेड(बालाजी सिलमवार):- कंधार तालुक्यातील बहाद्दरपुरा येथील मन्नेरवारलू समाजातील जेष्ठ नागरिक श्री शिवलिंग संभाजी दूलेवाड वय ७८ वर्ष यांचे आज दिनांक १८ रोजी दुपारी तीन वाजेच्या दरम्यान लोटस हॉस्पिटल नांदेड येथे अल्पशा आजाराने निधन झाले असून त्यांची अंत्यविधी उद्या दिनांक १९ ऑक्टोंबर रोजी बुधवार ला सकाळी अकरा वाजता त्यांच्या जानापुरी येथील आदिवासी आश्रम शाळा येथे होणार आहे.आठ दिवसापूर्वी श्री दुलेवाड सर यांना अचानक ट्यूमरचा त्रास वाढल्याने त्यांना नांदेड येथील लोटस हॉस्पिटल येथे आयसीयू मध्ये अडमिट केल्याचे कळते.उपचार चालू असताना त्यांची आज प्राणज्योत मावळली.मृत्युसमयी ते ७८ वर्षाचे होते.श्री संभाजीराव दुलेवाड गुरुजी हे लोहा तालुक्यातील मा.आमदार केशवराव धोंडगे यांच्या शिवाजी हायस्कूल सोनखेड येथे मुख्याध्यापक म्हणून तीस वर्ष शाळेचे कामकाज पाहिले त्यांच्या कार्यकाळामध्ये या शाळेची मोठी उभारणी झाली ते केशवराव धोंडगे साहेब यांच्या अत्यंत विश्वासू म्हणून परिचित होते.नौकरी नंतर गुरुजींनी शिक्षणाचा ध्यास घेऊन वंचित आदिवासी समाजाच्या मुलांसाठी आश्रम शाळेच्या माध्यमातून शिक्षणाचे दरवाजे उघडले.आज या शिक्षण संस्थेच्यामाध्यमातून अनेक विद्यार्थी या शाळेतून शिक्षण घेऊन स्वतःला स्वावलंबी झाले आहेत.त्यांनी या आश्रम शाळेची मान्यता मिळवून घेण्यासाठी अथक परिश्रम घेत उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालय,मंत्रालय याकडे योग्य पाठपुरावा करून शाळा व मान्यता मिळवून घेणारे कदाचित एकमेव व्यक्ती असेल.ते कॉम्रेड विचारसरणीचे,एक शिस्तप्रिय, आदर्श व्यक्तिमत्व, रोखठोक,स्पष्ट वक्ते म्हणून त्यांची जिल्ह्यात तथा परिसरात ओळख होती.दुलेवाड गुरुजींना दोन मुले,तीन मुली,जावई,नातू,पणतू असा आप्तेष्ट मोठा परिवार आहे.ते संभाजी दुलेवाड या आश्रम शाळेचे मुख्याध्यापक श्री शिवकुमार दुलेवाड सर,शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नांदेड येथील स्त्री रोग विभागाचे विभागप्रमुख डॉ शिरीष दुलेवाड यांचे वडील व जिल्हा समाज कल्याण अधिकारी श्री सतेंद्र आऊलवार यांचे मामा आणि औरंगाबाद येथील मन्नेरवारलू समाजाचे जिल्हाध्यक्ष श्री रमेश छबिलवाड,स्टेट बँकेचे मॅनेजर श्री तोटावार, मलशेटवार यांचे सासरे व स्वरूपेश छबिलवाड यांचे आजोबा होय. दुलेवाड गुरुजी यांच्या निधनाने परिसरामध्ये शोककळा पसरला आहे.
त्यांच्या आत्म्याला शांती लाभो ही ईश्वर चरणी प्रार्थना……!!