Home सातारा कै.संजय भैरवनाथ काळे विद्यालयात चिमुकल्यांचा बाजार व पारंपरिक वेशभूषा उपक्रम उत्साहात संपन्न….!

कै.संजय भैरवनाथ काळे विद्यालयात चिमुकल्यांचा बाजार व पारंपरिक वेशभूषा उपक्रम उत्साहात संपन्न….!

660

तासगाव – सतीश डोंगरे

सातारा , दि.ल३१ :- येथील रयत शिक्षण संस्थेचे कै. संजय भैरवनाथ काळे विद्यालय तासगाव .ता-जि-सातारा व आझाद कॉलेज ऑफ एज्युकेशन सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय आंतरवासिता सन २०१९-२० अंतर्गत विद्यालयामध्ये आठवडे बाजार व पारंपरिक वेशभूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या उपक्रमासाठी विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग दर्शवला आठवडी बाजारासाठी विद्यार्थ्यांनी विविध भाजी व फळभाज्या, खाद्यपदार्थ खेळणी इत्यादी दुकाने लावली होती.

पालकांनीही आठवडी बाजारात खरेदी केली.बाजार,किंवा गरजेच्या वस्तूंची खरेदी याच कुतूहल लहानग्यांना सदैवच असते. या व्यावसायिकतेची प्रत्यक्ष माहिती यावी याउद्देशाने आयोजित उपक्रमात कै.संजय भैरवनाथ काळे विद्यालयाच्या प्रांगणात विद्यार्थी व्यापारी रुपात अवतरले होते. या बाजाराचे मोठे कौतुक व कुतूहल पालक व विद्यार्थ्यांमध्ये दिसून येत होते.

विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव व प्रोत्साहित करण्यासाठी आयोजित पारंपारिक वेशभूषा स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी ऐतिहासिक पात्रे भूषवली .यामध्ये विद्यालयाच्या प्रांगणामध्ये राजमाता जिजाऊ ,राणी येसूबाई,राणी सईबाई, गोपिकाबाई ,रमाबाई ,टीव्ही कलाकार , संत बाळूमामा ,तात्या इत्यादी वेशभूषा मध्ये आवतरळ्याने संपूर्ण शाळेचा परिसर जणू ऐतिहासिक बनला होता.

या सदर चिमुकल्यांचा बाजार व वेशभूषा कार्यक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक एस जे घाडगे, पर्यवेक्षक ढाणे सर, आजाद कॉलेजचे प्राध्यापक एच.डी. पाटील व शाळेचा शिक्षक वृंद यांचे मार्गदर्शन लाभले.या उपक्रमासाठी आझाद बीएड कॉलेज चे प्रथम वर्षाचे प्रशिक्षणार्थी आणि शाळेच्या विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.