Home यवतमाळ देशातील पहिली नॅशनल बंजारा बँक, “दिग्रस येथे सुरू होणार”

देशातील पहिली नॅशनल बंजारा बँक, “दिग्रस येथे सुरू होणार”

189

 

दिग्रस  – दिग्रस तालूका जी. यवतमाळ येथे लवकरच *”नॅशनल बँक ऑफ बंजारा”, “नॅशनल बंजारा को-ऑफरेटीव बॅंक” बंजारा अर्बन बॅंक या नावाची बँक लवकरच उभारण्याचे निश्चिय करण्यात आले आहे या संबंधीची प्रथम बैठक दि 29 ऑक्टोबर 2022 ला सकाळी 11 वा. नाईक कॉम्प्लेक्स मानोरा चौक दिग्रस जि. यवतमाळ येथे आयोजित करण्यात आले होते. या बैठकीचे अध्यक्ष माजी जी. प. उपाध्यक्ष बाबूसिंग नाईक हे होते, या बैठकीला खालील मान्यवर
माजी आमदार अनंतकुमार पाटिल, माजी विज महामंडळ सदस्य अनिल राठोड , महंत रमेश महाराज , माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष बाबूसिंग नाईक , माजी सभापती भोजराज चव्हाण, माझी आयुक्त सहकार क्षेत्र बळीभाऊ राठोड, मोहन जाधव भाजपा .वि.जे.एन.टि. आघाडी जिल्हाध्यक्ष यवतमाळ, शंकर आडे, मधुकर नाईक ,परसराम राठोड ,माणिक राठोड, डॉ. सुरेश जाधव, इंजि रतन पवार ,श्रीचंद जाधव, नरेश जाधव, जय चव्हाण आदि प्रमुख मान्यवराच्या उपस्थितित शेतकर्यांचे पाईक लोकनेते अनंतकुमार पाटील यांच्या लोकहीतार्थ सुवर्ण संकल्पनेला कृतीमध्ये उतरविण्यासाठी श्रीमंत बाबुसिंग नाईक यांनी सहमती दर्शवून आज दिग्रस येथे बैठक संपन्न झाले.