Home वाशिम वाशिम जिल्ह्यामध्ये अवैध गुटखा विक्री करणाऱ्यांवर धडक कारवाईत १२.१५ लाखांचा मुद्देमाल जप्त

वाशिम जिल्ह्यामध्ये अवैध गुटखा विक्री करणाऱ्यांवर धडक कारवाईत १२.१५ लाखांचा मुद्देमाल जप्त

151

 

वाशिम:-समाजात शांतता व सुव्यवस्था राहावी त्याचबरोबर अवैध धंद्यांवर प्रतिबंध व्हावा यासाठी वाशिम जिल्हा पोलीस दलातर्फे सतत कारवाया सुरु असतात. त्याच पार्श्वभूमीवर वाशिम जिल्ह्यात अवैधरित्या गुटखा विक्री करणाऱ्यांना पायबंध घालण्याकरिता जिल्ह्यात विशेष मोहीम राबविण्यात आली.


त्या अनुषंगाने दि.०३.११.२०२२ रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, कारंजा व पो.स्टे.मानोरा यांच्या संयुक्त पथकाने महाराष्ट्र शासनाकडून प्रतिबंधित असलेल्या वेगवेगळ्या कंपनीचा गुटखा पो.स्टे.मानोरा हद्दीत १२,१४,८३९/- रुपयांचा गुटखा जप्त केला. मानोरा शहरातील वेगवेगळ्या ०५ ठिकाणी छापा टाकला असता मानोरा येथील १) अपना स्वीट मार्ट येथील छाप्यात ०२ आरोपींसह अंदाजे ४,३७,७२१/- रुपयांचा मुद्देमाल, २) संगम किराणा गोडाऊन येथील छाप्यात ०१ आरोपीसह अंदाजे १,४०,७३२/- रुपयांचा मुद्देमाल, ३) दातीर किराणा गोडाऊन येथील छाप्यात ०१ आरोपीसह अंदाजे ४,२१,५८०/- रुपयांचा मुद्देमाल, ४) व्यंकटेश स्वीट मार्ट येथील छाप्यात ०१ आरोपीसह अंदाजे १,९८,३५६/- रुपयांचा मुद्देमाल व ५) सोमनाथ टीन पत्र्याचे दुकान येथील छाप्यात ०१ आरोपीसह अंदाजे १६,४५०/- रुपयांचा मुद्देमाल असे एकूण ०५ आरोपींसह अंदाजे रुपये १२,१४,८३९/- रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपींवर पो.स्टे.मानोरा येथे गुन्हे दाखल केले असून पुढील कायदेशीर कारवाई सुरु आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री.बच्चन सिंह (IPS) यांचे मार्गदर्शनात उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.जगदीश पांडे यांच्या पथकाने पो.स्टे.मानोरा येथील पोलीस अधिकारी व अंमलदारांच्या मदतीने पार पाडली. श्री.बच्चन सिंह (IPS) पोलीस अधीक्षक, वाशिम यांनी सर्व जनतेस सुजाण नागरिक या नात्याने अशा प्रकारची काही तक्रार असल्यास नियंत्रण कक्षास माहिती द्यावी त्या इसमाचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल, असे आवाहन केले आहे.

प्रतिनिधी:-फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206