Home यवतमाळ दारव्हा शहरात पालकमंञी मा. ना. संजय राठोड यांच्या कडून काकड दिंड्यांचे स्वागत…!

दारव्हा शहरात पालकमंञी मा. ना. संजय राठोड यांच्या कडून काकड दिंड्यांचे स्वागत…!

112

 

दारव्हा शहरात आज पहाटेपासून निघालेल्या काकड दिंड्याचे स्वागत व पूजन राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा यवतमाळ व वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना.संजय भाऊ राठोड यांनी केले.यावेळी त्यांनी भाविकांशी संवाद साधून त्यांना भेट वस्तू दिल्या.

गल्लीबोळातून परिसराला प्रदक्षिणा घालत टाळमृदंगाच्या तालावर भजन,अभंग व भक्तीगीतांनी वातावरण न्हाऊन निघत होते.सर्व दिंडी मार्गावर माता – भगिनी सडा रांगोळीने स्वागत करत या भक्तिमय वातावरणाचा उत्साह वाढवत होत्या.

दीडशे वर्षांची परंपरा असलेला हा उपक्रम मा.ना.संजय भाऊ राठोड यांनी २००६ पासून दारव्हा शहरात सुरू केला,१६ काकड दिंड्या यात सहभागी झाल्या होत्या.